प्रतिनिधी – महेश सूर्यवंशी
दौंड: वाढलेल्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत असताना महावितरणने दौंड तालुक्यातील नागरिकांना भारनियमनाचा शॉक दिला आहे. विजेची वाढलेली मागणी आणि कोळशाचा तुटवडा यामुळे महावितरण कंपनीने परिपत्रक काढून सक्तीचे भारनियमन सुरु करण्याचे आदेश दिले आहे. तालुक्यातील सर्व फिडर वर सहा ते आठ तासांचे चक्री भारनियमन करण्यात येत आहे. मात्र, लोडशेडींगचे वेळापत्रक बाबत अद्याप नियोजन झालेले नाही. जिल्ह्यात ज्या भागातील वसुली कमी त्या भागात अधिकचे लोडशेडींग असा फॉर्म्यूला महावितरणने ठरवला असल्याची माहिती आहे. थकीत वीज बिलाच्या सक्तीच्या वसुली नंतर लोडशेडींगच्या त्रासामुळे महावितरण कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.