प्रतिनिधी, महेश सूर्यवंशी
“दौंड तालुक्यातील स्वतंत्र प्रांत कार्यालय व वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आले आहे”. उंडवडी, ता. दौंड येथे ग्रामपंचायत व आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून सुमारे १ कोटी ७० लाख रुपये किमतीच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण प्रसंगी आमदार राहुल कुल बोलत होतेे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, खामगाव – पिंपळगाव या रस्त्याच्या चालू कामासाठी चांगल्या प्रकारे निधी मिळालेला असून हे काम देखील लवकरच पूर्ण करण्यात येईल. गेल्या अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमुळे तालुक्यातील तसेच राज्यातील अनेक विकास कामांना मर्यादा येत होत्या पण आता शिंदे फडणवीस सरकार आल्यामुळे दौंड तालुक्यातील विकास कामांना गती मिळणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने टाटा मुळशी धरणाचे पाणी मुळा मुठा पात्रामध्ये वळवण्याच्या कामाला गती मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे २०१९ मध्ये मंजूर झालेल्या प्रांत कार्यालयाला निधी मिळाला नाही पण आता प्रांत कार्यालय व वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय हे लवकरात लवकर सुरू करून तालुक्यातील जनतेला करावी लागणारी पायपीट कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
त्याचबरोबर दौंड तालुक्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे ३३ कोटी रुपयांचे काम दौंड शहरामध्ये चालू आहे. अनेक राखलेल्या कामांना गती देऊन ही कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी व उंडवडी गावाच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे यावेळी आमदार कुल सांगितले.
👉 उंडवडी येथे भुमिपुजन व लोकार्पण करण्यात आलेली कामे व रक्कम पुढील प्रमाणे १) उंडवडी गावठाण नळ पाणी पुरवठा योजना – १ कोटी १६ लक्ष रुपये
२) उंडवडी गावठाण अंतर्गत बंदिस्त गटर लाईन – १५ लक्ष रुपये
३) ग्रामपंचायत उंडवडी बहुउद्देशीय सभागृह १५ लक्ष रुपये
४) जि. प. प्राथ. शाळा भोसलेवाडी इमारत – ०८ लक्ष रुपये
५) जि.प.प्राथ. शाळा गावठाण इमारत – ०८ लक्ष रुपये
६) भोसलेवाडी स्मशानभुमी सुशोभिकरण – ०३ लक्ष रुपये
७) उंडवडी गावठाण जलशुद्धीकरण खोली – २.५ लक्ष रुपये
८) जि.प.प्राथ. शाळा सांस्कृतिक स्टेज भोसलेवाडी – १.२३ लक्ष रुपये ९) जि.प.प्राथ. शाळा सांस्कृतिक स्टेज उंडवडी गावठाण – १.२३ लक्ष रुपयेयाप्रसंगी उपस्थित भाजपा नेते तानाजी दिवेकर, भीमापाटस चे संचालक माणिक कांबळे, उंडवडीच्या सरपंच दिपमाला जाधव, उपसरपंच विकास कांबळे, राहूचे सरपंच दिलीप देशमुख, सुभाष यादव, रवींद्र होले, पांडुरंग आखाडे, दत्तात्रय आखाडे, विशाल भोसले, शामराव दोरगे, संभाजी नातू, , उंडवडी ग्रामपंचायतचे सदस्य मैना गुंड, विमल जाधव, सुनील नवले,पोलीस पाटील राजेंद्र जगताप, मा. तंटामुक्ती अध्यक्ष सचिन गुंड, मा. सरपंच विकास सोनवणे, मा. उपसरपंच लक्ष्मण भंडलकर, मा. सरपंच मुरलीधर भोसले, पाणीपुरवठा अध्यक्ष संपत टिळेकर, रोहिदास जाधव, रवी पांढरे, भिकू कांबळे आणि सर्व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश गडदे यांनी केले व आभार उपसरपंच विकास कांबळे यांनी केले.