जनता एक्सप्रेस मराठी न्यूज दौंड प्रतिनिधी
अजय तोडकर मो.नं.7776027968
दौंड : भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणानुसार दौंड तालुक्यातील मुख्य कार्यकारिणी, किसान मोर्चा, ओ. बी. सी. मोर्चा, युवा मोर्चा, वाहतूक आघाडी व विद्यार्थी आघाडीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. किसान मोर्चाच्या तालुकाध्यक्ष पदी देऊळगाव राजे येथील अभिमन्यू गिरमकर, ओ. बी. सी. मोर्चा तालुकाध्यक्षपदी रोहिदास टिळेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी अॅड. बापूराव भागवत, वाहतूक आघाडी तालुकाध्यक्षपदी सुनील दोरगे, तर विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्षपदी सुरज ठोंबरे यांची निवड करण्यात आली आहे.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आमदार राहुल यांनी तसेच पुणे जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्ष कांचन कुल यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील नागरिकांच्या पर्यंत पोहचविणार असल्याचे सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर उर्वरित आघाड्या लवकरच जाहीर करणार असल्याचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे माऊली ताकवणे यांनी सांगितले आहे.
प्रसंगी तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, हरिभाऊ ठोंबरे, मोहन म्हेत्रे, नीलकंठ शितोळे, उमेश देवकर, शब्बीर सय्यद, बाळासाहेब लाटकर, मुरली भोसेकर, किसन शिंदे, दादासाहेब केसकर, संजय इनामके व नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते.