जनता एक्सप्रेस मराठी न्यूज दौंड प्रतिनिधी
अजय तोडकर मो.7776027968
दौंड : स्वत: राजकारणात उडी घेतल्याशिवाय आपल्याला हवे असलेले बदल घडू शकणार नाहीत, हे आजच्या तरुणाईनं ओळखलं आहे. त्यामुळेच प्रत्यक्ष कृतीचा मार्ग अवलंबत आधी राजकारणाविषयी उदासीन असलेले तरुणसुद्धा आपल्या मागण्या सरकार दरबारी मांडण्यासाठी शिवसेनेचा मार्ग धरत आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही तरुण मंडळी कॉलेज, अभ्यास, नोकरी हे सगळं सांभाळून राजकारणात सक्रिय होत आहेत.
याच विचारातून आज दौंड विधानसभा मतदार संघातील आदित्य अरुण खोमणे, दादा नागेश फासगे, दया लहू शिंदे, अक्षय मारुती उच्छे, दादा बाळासाहेब आरवडे, गेणसिद्ध भीमाशंकर म्हेत्रे, अक्षय नवनाथ गाडे, मिलिंद अनिल तोरणे, ऋतिक बंडू परदेशी, स्वप्निल सुदाम जगताप, अभिषेक धनेश गायकवाड, चेतन राजेंद्र फडके, सत्यम लक्ष्मण गायकवाड, कुंदन अभिमान खंडागळे, सागर मच्छिंद्र गायकवाड, प्रणव नितीन सूर्वे, विठ्ठल राजेंद्र लांडगे, शुभम लक्ष्मण गायकवाड, हर्षद आबुराव खारतोडे, भाऊसाहेब मधुकर फडके या तरुणांनी शिवसेना जिल्हाप्रमुख मा.महेशदादा पासलकर यांच्या हस्ते शिवबंधन बांधून युवासेनेत प्रवेश केला.
याप्रसंगी युवासेना जिल्हा समन्वयक निलेश मेमाणे,युवासेना उपजिल्हा अधिकारी योगेश फडके,शिवसेना उपतालुका प्रमुख विजयसिंह चव्हाण, मी युवासेना तालुका अधिकारी समीर भोईटे, युवासेना समन्वयक तथा अभिनेते सागरआप्पा शेलार, युवासेना विभाग अधिकारी प्रदीप चव्हाण, शिवसेना उपविभाग प्रमुख राहुल फडके, युवासेनेचे मयूर सोनवणे, निलेश माने, तुषार मोरे व इतर शिवसैनि
क पदाधिकारी उपस्थित होते.
🦌 इंदापूर तालुक्यातील चिंकारा शिकार प्रकरण ..सविस्तर पहा..खालील लिंक वर क्लीक करा.👇👇🦌🦌