देशाच्या सर्वोच्चपदी प्रथमच आदिवासी कुटुंबातील महिलेची निवड ही देशवाशियांच्या दृष्टीने अभिमानास्पद – हर्षवर्धन पाटील

नूतन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची हर्षवर्धन पाटील यांनी घेतली भेट
– दिल्लीमध्ये केले अभिनंदन!
इंदापूर: आज भारताच्या नूतन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची दिल्लीत भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि.22) भेट घेऊन देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशन च्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे उपस्थित होत्या.देशाच्या 15 व्या राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणूकीची मतमोजणी गुरुवारी ( दि.21) नवी दिल्लीत पार पडली. या मतमोजणीत द्रौपदी मुर्मू जी ह्या मोठ्या मतांच्या फरकाने विजयी झाल्या. द्रौपदी मुर्मू जी यांचा राष्ट्रपती पदाचा शपथविधी सोहळा सोमवारी (दि.25 जुलै ) संपन्न होत आहे. देशाच्या घटनात्मक अशा सर्वोच्चपदी प्रथमच आदिवासी कुटुंबातील सर्वसामान्य महिलेची झालेली निवड ही देशवाशियांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची व अभिमानास्पद अशी बाब आहे, असे भेटीत हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. यावेळी हर्षवर्धन पाटील व अंकिता पाटील ठाकरे यांनी नूतन राष्ट्रपतीशी संवादही साधला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here