सासवड(प्रतिनिधी-गणेश खारतुडे) : पुरंदर तालुक्यातील वीर येथील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबाची सध्या यात्रा सुरू आहे. त्यामुळे या मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी आहे. याच गर्दीचा फायदा घेऊन मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या तब्बल ५ लाख १५ हजाराच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली असून अतुल राजेंद्र वीर (वय-३२ वर्ष, व्यवसाय सलुन, मुळ रा. वीर, ता. पुरंदर, जि. पुणे, हल्ली रा. धारावी ९० फुटी रोड, भाग्यलक्ष्मी बिल्डींग, रूम नं. ५१४ मुंबई यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे
सासवड पोलिस स्टेशनकडुन मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ता. २४/०२/२०२२ रोजी दुपारी १.३० वा. ते २.०० वा.चे सुमारास श्रीनाथ म्हस्कोबा मंदीरात दर्शनावेळी सदर आरोपी दिपक मच्छिंद्र जाधव (रा. शास्त्रीनगर नाळवंडी, चौक बीड), २ ) शैलेंद्र सुरेश जाधव (रा. बलभीम नगर, बीड), ४) संदीपान अंकुश जाधव
( रा. राजीवनगर बीड व इतर दोन इसमांनी १) १,७५,००० रूपये किंमतीचे साडेतीन तोळे वजनाची सोन्याची चैन, २) ५०,०००/- रूपये किंमतीची एक तोळा वजनाची विशाल सुनिल पवार (रा. हांडेवाडी, पुणे) यांची सोन्याची चैन, ३) ५०,०००/- रूपये किंमतीचे एक तोळा वजनाचे सुनिता अनिल पोटे (रा. आनंदनगर, ठाणे) यांचे मनी मंगळसुत्र, ४) ७५,०००/- रूपये किंमतीची दिड तोळा वजनाचे ज्योती मारूती राऊत (रा. चिखली, पुणे) यांचे सोन्याचे गंठण, ५) ५०,०००/- रूपये किंमतीची एक तोळा वजनाची प्रभावती सुरेश कवडे (रा.लोणी काळभोर) यांची सोन्याची चैन,
२५,०००/- रूपये किंमतीची सुभद्रा एकनाथ कामथे (रा. चांबळी ता. पुरंदर जि. पुणे) यांचे अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे डोरले, ७) ९०,०००/- रूपये किंमतीचे जीवन गोविंद जगताप (रा. उरूळी कांचन) यांचे पावणे दोन तोळे वजनाची सोन्याची चैन असा एकुण ५,१५,०००/- रुपयांचे फिर्यादीचे व इतर भाविकांचे सोन्याचे दागिने चोरी करून चोरून नेले आहेत.
सासवड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ६५ / २०२२ भा. द. वि. कलम ३७९, ३४ नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पो.ना. अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार जाधव करीत आहेत.