प्रतिनिधी : महेश सूर्यवंशी
देऊळगाव राजे ता.दौंड मध्ये पावसाने थैमान घातले आहे. अपेक्षे पेक्षा जास्त पावसामुळे या वर्षी सर्व पिके जमीनदोस्त झाली आहेत. ऊस, कापूस,कांदा,उडीद,सोयाबीन, टोमॅटो, वांगी,मिरची या पिकांची अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मोठ्या मोठ्या ताली फुटून निघाल्या आहेत. काल रात्री (ता.१७ ऑक्टो) ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या मुळे व्यावसायिकांच्या दुकानामध्ये पाणी शिरून नुकसान झाले,तसेच घरामधेही पाणी शिरले आहे. शासनाचा निर्णयानुसार 15 ऑक्टोबर ला साखर कारखाने चालू झाले आहेत सर्व ऊस तोडणी कामगार गटात पोहचून ठराविक ठिकाणी तोडणीची कामे चालू झाली होती. आता परतीच्या मुसळधार पावसामुळे ऊस तोडणी कामगारांचे काम बंद झाले असून राहण्याचे हाल होत आहेत *विजेचे खांब पडून वीजपुरवठा विस्कळीत झालेला आहे . महावितरण कर्मचाऱ्यांचे युद्ध पातळीवर वीज पूनर्जोडणीचे काम चालू आहे.* पावसामुळे भरपूर प्रमाणात नुकसान होऊनही शेतकऱ्याच्या कुठल्याही प्लॉट ची अजून शासनाने दखल घेऊन पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. लवकरात लवकर शेतीमालाच्या नुकसानीचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.