देऊळगाव राजे, ता.दौंड (प्रतिनिधी:महेश सुर्यवंशी) -प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद आरोग्य विभाग,पुणे पंचायत समिती आणि दौंड व प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव राजे यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबिराचे रविवारी (ता.20) आयोजन करण्यात आले होते. हृदयरोग, उच्चरक्तदाब, मधुमेह, दमा, स्त्रीरोग, अस्थिरोग, बालरोग चिकित्सा, नेत्ररोग, नाक-कान घसा, त्वचारोग, संबंधित २४० हून अधिक रुग्णांची शिबिरात तपासणी आणि चाचण्या करून मोफत औषधोपचार देण्यात आले तसेच पंचकृशितील असंख्य नागरिकांनी शिबिरास भेट दिली.
शिबिराचे उद्घाटन सौ,ताराबाई देवकाते यांच्या हस्ते झाले. देऊळगाव राजे आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश अल्लामवार , डॉ.भक्ती ताटे, फिजिसियन डॉ. बजरंग काळे, स्त्रीरोग तज्ञ डॉ.कारंडे, बालरोग तज्ञ डॉ.अर्चना संजय वाघमारे, नेत्ररोग तज्ञ डॉ.शिंदे , यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव राजे कर्मचाऱ्यांनी नियोजन केले.