देऊळगाव राजे मध्ये लाईनमन दिवस साजरा..वाचा सविस्तर.

प्रतिनिधी : महेश सूर्यवंशी
देऊळगाव राजे.ता. दौंड देशभरातील लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्र शासनाने ४ मार्च २०२३ रोजी देशभरात लाईनमन दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ मार्च रोजी महावितरणमध्ये सर्वत्र लाईनमन दिवस साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्त देऊळगाव राजे उपकेंद्रात पहिला लाईनमन दिवस केक कापून साजरा करण्यात आला. जनमित्र म्हणजेच लाईनमन हा महावितरणच्या व्यवस्थेमधील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.महावितरणचे जनमित्र ऊन, वारा, पाऊस तसेच इतरही अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ते चोवीस तास सेवा देतात. त्यांच्या या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय ग्रामीण भागात विभाग कार्यालयाचे कार्यक्षेत्र विस्तारलेले व दुर्गम आहे अशा विभागांतील उपविभाग कार्यालय किंवा अतिदुर्गम शाखा कार्यालयांमध्ये स्वतंत्रपणे लाईनमन दिवसाचे आयोजन करण्यात येणार आहे.देऊळगाव राजे मध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ नितीन मेंगावडे यांनी माहिती दिली. दादासाहेब मेंगावडे, सौरभ देशमाने ,योगेश परकाळे नंदकुमार मरगर ,सतीश चिंचघरे, गणेश जगताप हे देऊळगाव राजे उपकेंद्रात कार्यतत्पर सेवा देत आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here