दौंड:(प्रतिनिधी: महेश सूर्यवंशी)- गेली अनेक दिवसांपासून महावितरण कंपनीने शेती वीज पंपाची लाईट बंद केल्यामुळे देऊळगावराजे(ता. दौंड)येथे सोमवार पासून महावितरण कंपनीच्या विरोधात बेमुदत आमरण उपोषण सुरु केले असून दौंड तालुका भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष अभिमन्यु गिरमकर आणि हिगणीबेर्डी येथील युवा शेतकरी ओंकार तापकिर हे उपोषणाला बसले आहेत,शेती पंपाची सक्तिची विज बिल वसूली थांबऊन शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बिल माफ करावे आणि, खंडित वीज पुरवठा त्वरित पुर्ववत करावा या प्रमुख मागण्या करीता हे उपोषण केले आहे,या उपोषणाची सुरुवात देऊळगावराजेचे ग्रामदैवत भैरवनाथ यांचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करण्यात आली, यावेळी दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, केशव काळे, अनिल सूर्यवंशी,दत्तात्रय खळदकर,लक्ष्मण रांधवन,तुकाराम आवचर, राजेंद्र बुराडे,जगन्नाथ बुराडे, नंदकिशोर पाचपुते बाळासाहेब इंदलकर संतोष गायकवाड आदि मान्यवर आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते, परिसरातील शिरापूर बेरिबेल पेडगाव या ग्रामपंचायतीनी आणि दौंड वकील संघटना यांनी पाठिंब्याची पत्र यावेळी दिली,आता यातून महावितरण काय तोडगा काढणार हे पुढील काळात पाहावे लागणार आहे.