दूध दरात वाढ झाल्यास त्याचा फायदा लाखो शेतकऱ्यांना होईल – राजवर्धन पाटील

दूध दरात वाढ झाल्यास त्याचा फायदा लाखो शेतकऱ्यांना होईल – राजवर्धन पाटील

दुध दरवाढीच्या अनुषंगाने दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध उत्पादक संघटनांसोबत मंगळवारी (दि.२१) मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला दुधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक राजवर्धन पाटील हे देखील उपस्थित राहिले होते. सदर बैठकीत दुध दरवाढ, दूध भेसळ आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांपुढील अडचणींसंदर्भात राजवर्धन पाटील यांनी मत व्यक्त केले.या बैठकीत राज्यात सुरू असलेल्या दूध भेसळीवर कठोर कारवाई केल्यास उत्पादित दूधाची निश्चित माहिती मिळेल. परिणामी कृत्रिम दूध कमी झाल्याने दूध उत्पादकांना दूध दरवाढ देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याबाबत चर्चा झाली आहे.शेतकरी संकटात असून सर्वत्र दुधाचे दर कमी झालेले आहेत. दूध दरवाढ ६ ते ७ रुपयांनी व्हावी अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. दूध दरात वाढ झाल्यास त्याचा फायदा लाखो शेतकऱ्यांना होईल व त्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास हातभार लागणार असल्याचे मत राजवर्धन पाटील यांनी बैठकीत व्यक्त केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here