आज तहसीलदार कार्यालयामध्ये दिव्यांग नागरिकांना शासन आर्थिक तसेच सामाजिक स्तरावरील विविध योजनांचा लाभ देत असते,योजनांचा लाभ मिळावा याकरिता दिव्यांग नागरिकांना प्रशासनिक वर्षाअखेरीस उत्पन्नाचा दाखला ,हयातीचा दाखला सादर करावा लागतो, जे दिव्यांग व्हीलचेअर,वॉकर व इतर साधनांचा वापर करतात. तसेच ज्या दिव्यांगांना दुसऱ्या व्यक्तीच्या आधाराशिवाय ज्यांना उभा किंवा बसता देखील येत नाही असे तसेच कृत्रिम अवयव असलेल्या दिव्यांग नागरिकांना विविध योजनेचा लाभ मिळवण्यासाठी हयातीचा दाखला मिळवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन समक्ष उपस्थित राहून हयातीचा असलेला पुरावा सादर करावा लागतो.दिव्यांग नागरिकांच्या दृष्टीने शासकीय दाखले काढण्यासाठीचा प्रवास आणि त्यासाठी केलेली कसरत अत्यंत कष्टदायक आहे. शासकीय पातळीवर दिव्यांगांना व त्यांच्या परिवारास यातना व वेदना दोन्हींचा सोबत सामना करावा लागतो,दिव्यांग नागरिकांना शासकीय कसरती मधून मुक्त करण्यासाठी ,जर एखाद्या गावात दिव्यांग नागरिक असेल तर ग्राम स्तरावर तलाठी, ग्रामसेवक ,कोतवाल, अश्या शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत नागरिकांचा हयातीत असलेला शेरा अथवा पुरावा संबंधित प्रशासकीय यंत्रणेस कळवत. दिव्यांग नागरिकांना आवश्यक असणारा हयातीचे आणि इतर दाखले शासकीय दाखले सुद्धा घरपोच मिळावेत, यासाठी नागरिकांना अतिशय हलापिष्ट सहन करावा लागतात, त्यामुळे आज इंदापूर तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मा. श्रीकांत पाटील साहेबांनायासाठी नागरिकांना आवश्यक असणारा हयातीचा आणि इतर शासकीय दाखले घरपोच मिळावेत दिव्यांग अशी मागणी असणारे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रेम कुमार जगताप यांनी तहसीलदारांना दिले..
Home Uncategorized दिव्यांग नागरिकांच्या हितासाठी भाजपयुमो नेते प्रेमकुमारजी जगताप यांनी तहसीलदार साहेबांना निवेदन दिले