पोलिस खात्याकडून पूर्वी सुरू असलेल्या डायल 100 नंबर ही सेवा बदलून आधुनिक पद्धतीची एमडीटी बेस्ड डायल 112 (Dial 112) ही सेवा सुरू झाली आहे.यामुळे मागील सेवेच्या तुलनेत अधिक वेगवान मदत नागरिकांना मिळणे शक्य होत आहे.पण याच विकसित झालेल्या चांगल्या तंत्रज्ञानाचा इंदापूर तालुक्यातील एका तळीरामाने गैरफायदा घेऊन इंदापूर पोलीस स्टेशनची चांगलीच तारांबळ केली.याबाबत इंदापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी माहिती दिली की,इंदापूर तालुक्यातील रेडणी या गावातून डायल ११२ या टोल फ्री क्रमांक वरती वारंवार निनामी कॉल इंदापूर पोलिसांना प्राप्त होत होता. सदर कॉल करणाऱ्या व्यक्तीने रेडणीमध्ये गांजा आणि व्हाईट पावडरची विक्री व नशा केली जात आहे, चोरीची गाडी पकडली आहे, दारूचा साठा एखादाच्या घरात आहे, रेडणीमध्ये चोर पकडले आहेत अशा माहिती देत होता. हा तळीराम रात्री 12 ते 2च्या दरम्यान कॉल करत होता. अशा प्रकारचे कॉल पोलिसांना पाच ते सहा वेळा प्राप्त झाले होते. पोलीस ज्यावेळी फोनवर मिळालेल्या घटनास्थळी जात असत त्यावेळी डायल करणारा व्यक्ती आपला मोबाईल बंद करून ठेवत असत. तीच व्यक्ती वारंवार वेगवेगळी आडनावे सांगून घटना 112 नंबर डायल करून देत असत. पोलिसांनी याबाबत सर्व यंत्रणा कामाला लावून चौकशी केली असता कोणतेही गैरकृत्य व अवैदय कारणामे निदर्शनास आले नाही. त्यानंतर निनावी कॉल केलेल्या व्यक्तीकडून काही माहिती मिळेल का? या उद्देशाने कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. परंतु डायल केलेला नंबर नेहमी स्विच ऑफ लागत होता. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत सदर व्यक्तीचा शोध सुरू झाला. आणि त्या व्यक्तीला इंदापूर पोलिसांनी कुशलता दाखवत अखेर शोधले. सदर कॉल केलेल्या व्यक्तीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय इंदापूर यांच्याकडे सदर व्यक्तीची तपासणी केली असता सदरचा व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचा अहवाल इंदापुर पोलिसांना मिळाला. त्यानंतर सदरच्या व्यक्तीने आपण हे सर्व नशेत केले असल्याची कबुली दिली.
सदरचा व्यक्ती नशेत असताना गावांमध्ये तसेच सर्वसामान्य लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून शांतता, सुव्यवस्था , जाती तसेच समाजामध्ये शतुत्चाची ‘ भावना निर्माण करून पोलीस प्रशासनाला खोटे बोलून नशेत चुकीची माहिती दिल्याबद्दल निनामी कॉल करणारी व्यक्ती दत्तात्रय रामचद्र चव्हाण रा.रेडणी,ता.इंदापूर यांच्यावरती भादवि कलम ५०५(२), महा दारूबंदी कायदा कलम ८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाजामधील अडचणीत असलेल्या व्यक्तीला तातडीने मदत मिळावी म्हणून केलेल्या सोयीचा अशाही प्रकारे तळीराम गैरफायदा घेऊ शकतो याची पोलीस प्रशासनाला कल्पनाही नव्हती. परंतु अशा प्रकारचे कृत्य कोणी करू नये असेे आवाहनही इंदापूर पोलीस स्टेशनच्या मार्फत करण्यात आहे.
Home Uncategorized दारूच्या नशेत 112 नंबर डाईल करून पोलिसांना वारंवार खोटी माहिती देणाऱ्या तळीरामास...