वैभव पाटील :पालघर जिल्हा प्रतिनिधी:-
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा महाराष्ट्र देशा….
या प्रमाणे उदघोष करीत दातिवरे हायस्कूल मध्ये १मे रोजी महाराष्ट्र दिन अगदी उत्साहात साजरा झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दातिवरे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व दातिवरे गावचे माजी सरपंच भारत राऊत होते. प्रमुख पाहुणे हेमंत शांताराम ठाकुर हे दातिवरे शिक्षण संस्थेचे शालेय समितीचे अध्यक्ष व विहंग विहार रिसोर्ट चे मालक उपस्थित होते.तसेच दातिवरे गावच सेवानिवृत्त गुरुजी सावळाराम आरेकर हे विषेश उपस्थित होते.शाळेचे ध्वजारोहण पी.एस.आय. दिपक राऊत यांच्या सुविद्य पत्नी व शाळेच्या माजी विद्यार्थांनी वनिता दिपक राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.त्या वेळी बोलताना त्यांनी एक विलक्षण आनंद होत असल्याचे सांगुन व अनेक शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.माध्यमिक शालांत परीक्षा मार्च१९८७ च्या बॅचने व त्यांच्या वर्ग मित्र परिवाराने महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मा.मुख्याध्यापक .ए.सी.राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली व शाळेचे शिपाई व याच बॅच चे माजी विद्यार्थी उमेश रामचंद्र भोईर यांच्या पुढाकाराने शाळेला इन्व्हर्टर संच भेट दिला.त्यावेळी माजी विद्यार्थी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त करतांना सुनिल रामचंद्र वसईकर यांनी शाळेच्या विद्यार्थांना उत्तम मार्गदर्शन केले.माजी विद्यार्थामध्ये निवृत्ती कृष्णाजी राऊत हे गेले २० वर्ष आपल्या मंडळाच्या माध्यमाने शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना एकवीस अपेक्षित पुस्तकाचे पाच संच भेट देत आहेत. तर सुबोध फाऊंडेशन विरार संस्थचे अध्यक्ष सागर राऊत व त्यांच्या टिमने यांनी संगणक कक्षतील बंद पडलेल्या ८ संगणकांची दुरुस्ती स्वखर्चाने करून शाळेला अनोखी भेट दिली.तसेच सर्व संस्थेच्या मान्यवरांनी व मुख्याध्यापक राठोड सर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सर्व दानकत्यांचे भरभरून कौतुक केले. सदर प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, गावचे संरपच,गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळेचे माजी विद्यार्थी व त्यांचे वर्ग मित्र परिवार तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे शिक्षक सुशिल ठाकुर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन रूपेश राऊत सर यांनी केले.अश्या प्रकारे महाराष्ट्र दिन दातिवरे शाळेत मोठ्या उत्साहात व आनंदात असा पार पडला.