वैभव पाटील :प्रतिनिधी
दातिवरे शिक्षण संस्थेचे माजी सन्मानीय अध्यक्ष दिवंगत शांताराम ठाकुर गुरुजी यांचे सुपुत्र लायन्स क्लब ऑफ इंडिया या सेवाभावी संस्थेचे पालघर जिल्हयातील मुळ आधारस्तंभ तसेच शासकीय बांधकाम क्षेत्रातील अगदी नामांकित ठेकेदार व्यक्तिमत्त्व व उद्योजक जगदिश शांताराम ठाकुर साहेब व त्यांचे कनिष्ठ बंधु हेमंत शांताराम ठाकुर हे दातिवरे शिक्षण संस्थेचे पदाधिकारी असुन शालेय समिती चे अध्यक्ष आहेत.तसेच या ठाकुर ब्रदर्स चे आज दातिवरे गावाला लाभलेले योगदान म्हणजे विहंगविहार रिसोर्ट जे कमी वेळेत जास्त लोकप्रिय झाले. असुन पंचक्रोशितच नाही तर संपुर्ण महाराष्ट्रात याचा गाजावाजा आहे. असे उत्तम उद्योगी व तितकेच समाजकार्यासाठी अग्रेसर असणारे हे ठाकुर कुटुंबं दातिवरे गावाला लाभलेले मोठे भाग्य आहे.यांचे पिताश्री दिवंगत शांताराम ठाकुर गुरुजी यांनी दातिवरे शाळेच्या अध्यक्षपदी २० वर्षे सेवा केली व दातिवरे शाळेचा चेहरा मोहरा बदलला.आज त्याच शाळेत त्यांची दुसरी व तिसरी पिढी देखिल त्यांच्याच विचारावर मार्गस्थ असुन शाळेसाठी वेळोवेळी अनेक प्रकारे सहकार्य करीत आहेत.२० वर्षा पुर्वी यांच्याच सहकार्याने लायन्स कल्ब च्या माध्यमाने संगणक या शाळेला उपलब्ध झाले होते.आज त्यांच्या ठाकुर कुटुंबांच्या वतीने जगदिश ठाकुर यांच्या समवेत तिसऱ्या पिढीचे तरूण तडफदार असे अनुज हेमंत ठाकुर यांच्या उपस्थितीत शाळेला नवीन तिन संगणक संच उपलब्ध करून देण्यात आले. त्या प्रसंगी जगदीश ठाकूर व अनुज ठाकूर यांनी ही विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्ष स्थानी असलेले हायस्कूल चे मुख्याध्यापक ए.सी.राठोड सर यांनी कै. शांताराम ठाकुर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळवे त्या साठी नविन तिन संगणक संच शाळेला भेट दिल्या बद्दल ठाकुर कुटुंबीयांचे मनापासून आभार व्यक्त करून शीळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांला संगणकीय ज्ञान देण्यात येईल असे आश्वसन त्यांनी दिले. कार्यक्रमाचे उत्तम सुत्र संचलन सुशिल ठाकुर सर यांनी केले तर रूपेश राऊत सर यांनी आभार व्यक्त करताना ठाकुर कुटुंबांच्या तिन पिढ्याचे आभार मानताना वातावरण भाऊक झाले.त्या प्रसंगी विद्यार्थी,शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.