मार्च 2022 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला यामध्ये श्री हनुमान विद्यालय अवसरी व माध्यमिक विद्यालय भांडगाव या विद्यालयांचा निकाल यावर्षी शंभर टक्के लागला असून या विद्यालयांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे .वर्षभर या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही घडवले त्यांना ज्ञान दिले त्याचे फळ आज मिळाले असे श्री हनुमान विद्यालयाचे मुख्याध्यापक लोंढे सर व माध्यमिक विद्यालय भांडगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री गायकवाड सर यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज शी बोलताना सांगितले. विद्यार्थ्यांनीही वर्षभर खूप परिश्रम घेतले अभ्यासाची चिकाटी सोडली नाही त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना हे यश मिळाले आहे असेही ते पुढे म्हणाले. श्री हनुमान विद्यालय अवसरी या विद्यालयांमध्ये प्रथम क्रमांक मुलींनी बाजी मारली असून कु. शिवानी मोतीराम सपकाळ, या मुलीने 88.60 गुण मिळवून शाळेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर द्वितीय क्रमांक विश्वजीत रमेश शिंदे 87.40 % आणि तृतीय क्रमांक शुभम कैलास शिंदे 87.00% यांनी मिळवले आहेत. असेच घवघवीत यश माध्यमिक विद्यालय भांडगाव या विद्यालयाचेही आहे. या विद्यालयामध्ये आमिर फजल सय्यद , या मुलाने 89% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे .तर द्वितीय क्रमांक संग्राम विष्णू गायकवाड 85.80% तर तृतीय क्रमांक प्रियंका महादेव शिंदे 85.60% हिने मिळवला आहे. श्री हनुमान विद्यालय अवसरी विद्यालयाच्या यशाबद्दल विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष अरुण दादा शिंगटे सह, सर्व सन्माननीय संचालक आणि ग्रामस्थांच्या वतीने मुख्याध्यापक श्री लोंढे सर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच माध्यमिक विद्यालय भांडगाव या विद्यालयाचे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भैरवनाथ ग्रामविकास प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. अशोक घोगरे ,सचिव सुरेश शिंदे ,मुख्याध्यापक श्री गायकवाड सर व सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.