इंदापूर: इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर आणि बालक मंदिर विभागाचे काल आठवे वार्षिक स्वराज्य स्नेहसंमेलन पार पडले. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी हर्षवर्धन पाटील अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून व पालकांच्या सहकार्याने आपण एक नवीन सक्षम पिढी तयार करू.विद्यार्थ्यांवर संस्कार त्याचप्रमाणे शिक्षण,सामाजिक जाणीव, क्रीडा याचे दर्जेदार शिक्षण देऊन शाळेतील मुला मुलींना आदर्श विद्यार्थी बनवण्याचा आपण प्रयत्न करू व ती आपली जबाबदारी आहे.” पुढे ते म्हणाले की,”लॉकडाऊनमुळे आपल्या शिक्षण संस्थेत वार्षिक स्नेहसंमेलन होत नव्हते परंतु आता आपण अधिकाधिक चांगल्या पद्धतीने स्नेहसंमेलन आयोजित करण्यास सुरुवात केली आहे व शिक्षक आणि कर्मचारी मिळून याचे चांगले नियोजन करत असल्याचा आनंद वाटतो.”
यावेळी नारायणदास रामदास हायस्कूलचे मुख्याध्यापक विकास फलफले ,नारायणदास रामदास इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका फौजिया शेख, उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया आगरखेड यांनी केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोषी बनकर, अमृता शिंदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन नंदा बनसुडे यांनी केले.
सदर स्नेहसंमेलनामध्ये 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.वैविध्यपूर्ण लोकगीते शिवजन्मोत्सव, शिवराय एक ऐतिहासिक पर्व,पोवाडे ,सामाजिक संदेश, देणारे गीत, शेतकरी नृत्य, राजस्थानी , आदिवासी नृत्य धनगरी नृत्य, सैनिकी नृत्य लावणी अशा बहारदार कार्यक्रमाबरोबरच लता मंगेशकर यांना आदरांजली देणारे गीत विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांमधून सादर केले. शालेय स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.
👆 पहा पुढील लिंक क्लिक करून https://youtu.be/96UI7J_epPk