दत्तामामांनी तालुक्यासाठी आणला पुन्हा एकदा घसघशीत निधी…. _मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मिळाले तब्बल १३.१३ कोटी …_

माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून पुन्हा एकदा इंदापूरला घसघशीत निधी प्राप्त झाला असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 आशियाई विकास बँक असर्थसाह्यय अंतर्गत योजनेतून तालुक्यातील तीन रस्त्यांसाठी तब्बल १३.१३ कोटी मंजूर झाले आहेत.मागील काही दिवसांपुर्वीच प्रधानमंत्री तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आमदार भरणे यांनी कोट्यावधी रूपये आणले होते.त्यानंतर लगेचच महिन्याभरात अजून तीन रस्त्यांना मंजुरी मिळाल्याने तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न मात्र भरणे यांच्या चिकाटीमुळे मार्गी लागणार आहेत.
आमदार भरणे यांनी काही दिवसांपूर्वी मंजूर केलेल्या कामांचे प्रसिध्दीपत्रक देत असताना येत्या काही दिवसात तालुक्यासाठी अजून मोठ्या कामांना मंजुरी मिळणार असल्याचे सुतोवाच केले होते.
त्याचा प्रत्यय आज आला असुन तालुक्यातील
१.इंदापूर ग्रामीण ते गलांडवाडी नं १ ते जाधववाडी वरकुटे बु रस्ता-ग्रामा ५९ – ६.८० कोटी
२.प्रजिमा-८४ निंबोडी ते घोळवे वस्ती रस्ता -२.९८ कोटी ३.रा.मा.१३२ काझड ते ज्योतिबाचीवाडी ते भवानीनगर रस्ता ग्रामा ३२०-३.३४ कोटी या तीन रस्त्यांसाठी आमदार भरणे यांच्या माध्यमातून १३.१३ कोटी नुकतेच मंजूर झाले आहेत.
या विषयी बोलताना श्री.भरणे म्हणाले की,आमदार या नात्याने तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असतो.आजपर्यंत आपण तालुक्यासाठी हजारो कोटी रूपये मंजूर करून आणले आहेत.विकासाची हिच गती चालू असून गेल्याच महिन्यात पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आपण तालुक्यातील विविध रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला होता.या नंतर आज लगेच वरील तीन रस्त्यांसाठी अजून १३.१३कोटी मंजूर करून आणले आहेत.
या रस्त्यांमुळे नागरिकांचे दळणवळण अजून सुलभ होणार असुन लवकरात लवकर सदरील कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याचे आमदार भरणे यांनी सांगीतले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here