मुलांपासून फुलांपर्यंत, मातीशी नाते असणा-या सर्वांबरोबर स्नेहाचे नाते जोडणा-या व आपल्या मनमिळाऊ स्वभावाद्वारे जपणा-या व त्याला कायमचे टवटवीत,सतेज ठेवणा-या मोजक्या व्यक्तीमत्वांमध्ये इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा समावेश होतो.अगदी बालपणापासून त्यांनी जी जी स्वप्ने स्वतःसाठी पाहिली, ती ती स्वतःच्या इच्छाशक्तीच्या बळावर प्रत्यक्षात उतरवली.ती स्वप्ने पहाताना लोकांचे भले करण्याचे स्वप्नही त्यांनी पाहिले होते.ते प्रत्यक्षात पूर्ण उतरवण्याचे कार्य ते गेल्या कित्येक वर्षापासून करत आहे आहेत.राज्यमंत्री असताना ते संपूर्ण राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी काम करत राहिले,मात्र इंदापूर तालुक्यातील जनतेशी असणा-या बांधिलकीत त्यांनी कधी ही अंतर होवू दिले नाही. संतांच्या अभंगांसारखी ती एकसंध व अर्थप्रवाहीच राहिली.कॉलेज जीवनात असताना देखील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना वही,पेन किंवा एखाद्याने जेवणाचा डबाही आला नसेल तर त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यापर्यंत त्यांचे बारकाईने लक्ष असणल्याचा किस्सा त्यांच्या कॉलेज जीवनातील मित्रांनी सांगितला.एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या दत्तात्रय भरणे यांचा राजकीय प्रवास हा आजच्या युवा पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.एका छोट्या खेड्यापासून सुरुवात करत छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक ते राज्याच्या मंत्रिमंडळात विविध सात खात्यांचे राज्यमंत्री त्याच बरोबर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा थक्क करणार आहे.एकतीस वर्षांपूर्वी अजित दादा पवार यांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर संचालक पदाची संधी देऊन दाखवलेला विश्वास सार्थकी ठरवत इंदापूर तालुक्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी आणून तालुक्यातील जनतेची सेवा करण्याची एकही संधी सोडली नाही.पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात २६० कोटी रुपयांचा विकासनिधी तालुक्यामध्ये आणून वैयक्तिक लाभांच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवत तालुक्याचा चेहरामोहरा बदलला. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष काय काय विकास करू शकतो हे त्यावेळी पूर्ण जिल्ह्याने पाहिले. हा विकास करत असतानाच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत मामांची नाळ जोडली गेली. आणि या विकास कामांच्या जोरावरच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उतरत राजकारणात दबदबा असणाऱ्या प्रतिस्पर्धी हर्षवर्धन पाटील यांना प्रथमच पराभूत केले. त्यावेळी राज्यात राष्ट्रवादी सत्तेत नसल्यामुळे दत्तात्रय भरणे यांना विरोधी पक्षाचे आमदार व्हावे लागले.परंतु सर्वसामान्याशी जुळलेली नाळ आणि तालुक्याचा विकास करण्याचे ध्येय उराशी बाळगून विरोधी पक्षाचे आमदार असताना देखील इंदापूर तालुक्यामध्ये १३५० कोटी रुपयांचा निधी आणत तालुक्याच्या विकासाला चालना दिली. तालुक्यात कुठे कार्यक्रम असेल त्या ठिकाणी लहान मुलांची गर्दी ही ठरलेली.. आमदार दत्तात्रय भरणे आले की मामा..मामा..मामा असा जल्लोष करणारी चिमुकली तालुक्याने पाहिली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात समाविष्ट होण्याच्या सवयीमुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना हवे हवे असणारे मामा घराघरांमध्ये पोहोचले. आणि २०१९ साली भरणे मामांनी दुसऱ्यांदा आमदार होण्याचा बहुमान मिळवला.भरणे यांची पक्षनिष्ठा व प्रामाणिकपणाच्या कामाची पोचपावती म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब, मा.उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी. भरणे मामा यांना राज्याच्या मंत्रिमंडळात विविध सात खात्यांचे राज्यमंत्री पदासह सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद ही बहाल केले. याही वेळी त्यांना अडीच वर्ष मंत्रिपदाचा कार्यकाळ मिळाला. परंतु या अडीच वर्षाच्या काळात विविध योजनांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे विविध खात्याअंतर्गत २२०० कोटी रुपयांचा निधी आणत इंदापूर तालुक्यात विकासगंगा आणली. कुणीही लहान मुलांनी याव मामांच्या मांडीवर बसावं मामांसोबत फोटो काढण्याचा आग्रह करावा. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना हवे हवे असणारे मामा तालुक्यासाठी अधिकाधिक निधी आणण्याचे, नवनवीन योजना आणण्याचे त्यांचे प्रयत्न सातत्याने चालूच असतात. त्यांचा त्याबाबतचा कारभार कायम पारदर्शक असतो. लोकांना तो दिसतो. परिणामी लोक अधिक जवळ येत रहातात. जोडल्या जाणा-या माणसांमुळे त्यांची जनमानसातील ताकद वाढतच जाते. अश्या ताकदीच्या लोकनेत्याला वाढदिवसानिमित्त अधिक ताकदवान होण्यासाठी शुभेच्छा.
शब्दांकन: अमोल राऊत