दगडवाडी गावात भाजपाला खिंडार..सरपंच व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश..

👉 इंदापूर तालुक्यातील भाजपला दगडवाडी गावातुन खिंडार..
इंदापूर तालुक्यातील राजकारण दिवसेंदिवस तापत असतानाच आज शनिवार दि 28 जानेवारी रोजी दगडवाडी ता इंदापूर येथील विद्यमान सरपंच स्वातीताई केसकर माजी सरपंच स्वातीताई आप्पासो पारेकर महादेव कवितके पोपटराव काळे चेअरमन विष्णू काळे संजय केसकर आप्पासो पारेकर नाथा पारेकर शंकर रासकर शिवाजी रासकर किसन मोठे कुदळे मेंबर लक्ष्मण रासकर बनकर मेंबर हर्षदा ताई काळे सोमनाथ काळे माणिक रासकर यामध्ये विद्यमान सरपंचांसह पाच ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच यांचा समावेश आहे.समवेत गावातील भाजप पक्षातील कार्यकर्त्यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला..यावेळी महादेव कवितके यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी कवितके म्हणाले की आम्ही दत्तात्रय भरणे यांच्या कामाचा झंझावात पाहिला आणि खर बोलणारी माणसे या पक्षात आहेत यामुळे आम्ही प्रवेश करतो आहे त्याच बरोबर खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारी पदाधिकारी या पक्षात आहेत तसेच गावात आमचा सरपंच भाजप पक्षाचा म्ह्णून निवडून आणला होता असे असताना आम्ही न मागता दगडवाडी सारख्या गावात निधी भरपूर मिळाला,,या गावाला निरवांगी ते दगडवाडी असेल तसेच सराफवाडी रस्ता असेल अशी अनेक कामे मामांनी मंजूर केली या बद्दल आम्ही सर्व दगडवाडीच्या वतीने आमदार भरणे मामांचे आभार मानतो असे मनोगता वेळी जाहीर केले.यापुढे आमदार भरणे मामांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादी पक्षात काम करत राहू आणि पक्षाला इथून पुढील काळात जास्तीत जास्त मतदान होईल अशी ग्वाही दिली… यावेळी दगडवाडी येथे श्रीक्षेत्र नंदिकेश्वर मंदिरास भेट देऊन मंदिर परिसरातील सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली.तसेच यावेळी “क” वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत डीपीडीसी च्या माध्यमातून मंजूर केलेल्या १५ लाख रुपयांच्या सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन तसेच जल जीवन मिशन योजनेच्या अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजने करता मंजूर केलेल्या १ कोटी ७४ लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाले. या पाणीपुरवठा योजनेमुळे दगडवाडी गावातील महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमस्वरूपी उतरणार असून नागरिकांना स्वच्छ घरपोच पाणी मिळणार आहे. तसेच दगडवाडी ते निरवांगी येथील रस्त्याकरिता 5 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर केला आहे या कामाची प्रत्यक्षात सुरवात थोड्याच दिवसात सुरू होईल असेही यावेळी दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.या भूमिपूजन प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,सचिन सपकळ,शुभम निंबाळकर,नंदू पाटील रनवरे,छायाताई पडसळकर,तसेच निरवांगी,खोरोची,घोरपडवाडी,निमसाखर,चाकाटी,रेडा,तरंगवाडी, गोखळी, सराफवाडी,पिटकेश्वर येथील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आमदार भरणे यांनी गावच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असा विश्वास दिला.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here