त्यागी,समर्पित, इमानदार,संघर्षशील नेतृत्व ॲड. राहुलजी मखरे: वाढदिवस विशेष

महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याची कुवत असणारं आणि संघर्षातून घडलेले त्यागी, समर्पित आणि सामाजिक इमानदारी असणारे लढाऊ नेतृत्व म्हणजे ॲड. राहुलजी मखरे साहेब.. ॲड. राहुल मखरे भिमा – कोरेगाव दंगलीतील मुख्य सुत्रधार मनोहर भिडे, एकबोटे आणि तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात भिमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर दंड थोपटून उभे आहेत.आर एस एस, भाजपाच्या लोकांकडून अनेक मोठी आमिषं आली तरी ही अमिषांना ते बळी पडले नाहीत. “स्वतः चा स्वार्थ बघितला तर मग माझ्यात आणि इतर स्वार्थी, दलाल नेत्यांमध्ये काय फरक राहील.” असे बोलून आमिषांना त्यांनी लाथाडले आहे.वकीली व्यवसायातून येणारा पैसा त्यांनी कधी घरी मुलांना,घरच्यांना दिला आहे किंवा कुटुंबीयांसाठी कधी काही खरेदी केलं आहे असं आम्ही कार्यकर्त्यांनी कधीच पाहिलं नाही.वकील साहेब आजारी असले तरी लोकांच्या समस्या सोडविण्याचे त्यांनी कधी थांबवले नाही.अंगठ्या, चैन, घड्याळ विकून लोकांना अडचणीत मदत केली. वकिल व्यवसायातील येणारा सर्व पैसा लोकांच्या आर्थिक अडचणीत दिला.वकील साहेबांनी शाळा कॉलेज मध्ये ऍडमिशन करुन दिली. कोर्ट कचेरीत अनेक लोकांची फुकट कामे करून दिली.जमीन व्यवहार असेल, दवाखान्यासाठी आर्थिक मदत असेल, गेल्या 15-20 वर्षात हजारो लोकांना त्यांनी मदत केली आहे.काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनाही त्यांनी पक्ष, राजकारण न आणता अडचणीच्या काळात मदत केली आहे. एवढेच नव्हे तर जीवावर उठलेल्या विरोधकांनाही त्यांनी मदत केली आहे.गुंडगिरी, भाईगिरी करणाऱ्या युवकांना ते नेहमी म्हणतात की, तुम्ही भांडण तंटे करा पण समाजासाठी, गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी..वकिल साहेबांनी लोकांच्या हितासाठी जे काही करायचं ते सर्व केलं आहे, करत आहेत.इंदापूर तालुक्यातील क्वचितच एखादं गाव असेल तिथे वकिल साहेबांची मदत झाली नसेल. खेडोपाडी गोरगरीबांवर अन्याय करणाऱ्यांवर त्यांनी कायदेशीर मार्गाने वचक निर्माण केला आहे.पाणी प्रश्नावर आंदोलन केलं, टोल कामगारांच्या साठी आंदोलन केलं,नगरपालिका कामगारांच्या साठी आंदोलन केलं, विद्यार्थ्यांच्या साठी आंदोलन केलं, देहू – पंढरपूर या होणार्‍या महामार्गात ज्यांच्या जमीनी जाणार आहेत. त्यांना योग्य भाव मिळावा म्हणून आंदोलन केलं. किरकोळ व्यापाऱ्यांसाठी आंदोलन केलं.आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरची लढाई लढताना बहुजन समाजाला जागृत करण्याचे ही काम प्रबोधनाच्या माध्यमातून निरंतर करत आहेत.अशा या त्यागी, समर्पित, इमानदार, संघर्षशील नेतृत्वास जन्मदिनाच्या शुभेच्छा. फक्त शुभेच्छाच नाही तर समाजहितासाठी तन मन धनाने साथ ही देवू.
(शब्दांकन:सुरजधाईंजे)
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here