कोरोना काळामध्ये अवघ्या जगाचे दिन चक्र व अर्थचक्र विस्कळीत झालेले होते. आजही ती विस्कळलेली घडी पूर्णपणे बसलेली दिसून आलेली नाही.अर्थव्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीने व ज्या प्रमाणात प्रगतीचा आलेख अपेक्षित होता त्या प्रमाणात तो प्रगतीचा आलेख दिसून येत नाही याचाच अर्थ असा की कोरोना काळापासून अनेक व्यापारी शेतकरी यांना कोरोना महामारीचा दुष्परिणाम झालेला दिसून येतो.ग्रामीण भागातील दळणवळणाचे मुख्य साधन समजले जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरी वरही याचा परिणाम झालेला दिसून आला होता. ग्रामीण भागात या लालपरी मुळे शेतकरी,विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिक यांना दळणवळण सोपे झालेले होते. परंतु कोरोना नंतर बहुतांशी गावांमध्ये बससेवा बंद करण्यात आली होती.इंदापूर तालुक्यात शेटफळ हवेली गावांमध्ये गेल्या 10 वर्षापासून इंदापूर ते शेटफळ हवेली मार्गे शहाजीनगर जाणारी बससेवा बंद होती.इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली मध्ये गाडी येत नसल्याने अनेक नागरिक व विद्यार्थ्यांना जाणे येण्यासाठी अडचण निर्माण झालेली होती आणि हीच अडचण भाजपाच्या विद्यार्थी तालुकाप्रमुख सुयोग सावंत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी इंदापूरच्या आगारप्रमुख श्री मनेर साहेब यांना एक निवेदन देऊन पुन्हा लालपरी आपल्या गावात यावी अशी विनंती केली. कर्तव्यदक्ष अधिकारी मनेर साहेब यांनी सर्व विद्यार्थी व शेतकऱ्यांची गरज ओळखून शेटफळ हवेली मार्गे शहाजीनगर गावांमध्ये पुन्हा बस सेवा चालू केली.आज शेटफळ गावामध्ये ही लालपरी आल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी आनंदाने या लालपरीचे स्वागत केले.गावात बस येताच गावकऱ्यांनी टाळ्यांच्या स्वागतात तोफांची सलामी देऊन लालपरीचे जय्यत स्वागत केले.लाल परीच्या स्वागताचा श्रीफळ हा महिलांना प्राधान्य देऊन सुवर्णा नलवडे-मोरे व मनीषा शिंदे-बागल यांच्या हस्ते करण्यात आला.गावकऱ्यांनी एकत्र येऊन एसटी वाहतूक नियंत्रक एस एम कांबळे, चालक बी एस करे, वाहक एस एम पिसे या कर्मचाऱ्यांचे फेटा शाल श्रीफळ देऊन गावकऱ्यांच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी चालू झालेली बस सेवा ही पुन्हा विस्कळीत होऊ नये अशी ग्रामस्थांनी बस अधिकारी व चालक वाहक यांना विनंती केली.शेटफळ हवेली चे सरपंच संतोष पवार, उपसरपंच सचिन शिंदे हरिभाऊ पुंडे,हनुमंत आप्पा शिंदे,सचिन फडतरे, शिवाजी निकम,अतुल येवले,रामभाऊ माने,बाळू काका शिंदे,विष्णू आबा शिंदे, रामभाऊ पवार, भैया मुलानी, विजय शिंदे, विजयदादा शिंदे, बाळासाहेब नलवडे, पांडुरंग आबा शिंदे,शंकर(मेंबर)चव्हाण, विजयसिंह कानगुडे,तानाजी नरबट, शरद शिंदे सचिन दरेकर, कालिदास शिंदे,भारत चव्हाण, विठ्ठल सपकाळ, विठ्ठल नलवडे, निजाम शेख, मुरलीधर चव्हाण, मुरलीधर चव्हाण, आजिनाथ पवार,कमलेश चव्हाण, भारत ढोबळे, बापू गुरव, शिवाजी तात्या शिंदे इत्यादी ग्रामस्थ या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित होते