इंदापूर : भारत सरकारच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘मिलेट्स ऑफ मंथ’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.यामध्ये प्रत्येक महिन्यासाठी एक तृणधान्य निश्चित केले असून त्या तृणधान्याचा आहारातील वापर वाढविण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.त्यामुळे जानेवारी हा महिना बाजरी या पिकासाठी समर्पित असल्याने याचे औचित्य साधून तालुका कृषी अधिकारी श्री. भाऊसाहेब रूपनवर, बावडा मंडळ कृषी अधिकारी श्री. गणेश सूर्यवंशी आणि भिगवण मंडळ कृषी अधिकारी श्री. बाळासाहेब कोकणे यांचे मार्गदर्शनाखाली मौजे अवसरी येथील महिला शेतीशाळेत पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित महिलांना श्री. रूपनवर साहेब यांनी पौष्टिक तृणधान्य यांचे आहारातील महत्त्व तसेच वेगवेगळ्या तृणधान्यांच्या विविध पाककृती याबद्दल मार्गदर्शन केले. श्री. कोकणे साहेब यांनी उपस्थित महिलांना यशस्वी महिला उद्योजक आणि अन्न प्रक्रिया उद्योग याबाबत मार्गदर्शन केले. श्री. सूर्यवंशी साहेब यांनी वेगवेगळ्या तृणधान्यांचे पौष्टिक मूल्य व वेगवेगळ्या तृणधान्यांच्या पाककृती आणि प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग व कृषी विभागाच्या विविध योजना याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी कृषी सहाय्यक अनुपमा देवकर यांनी बाजरी पासून वेगवेगळ्या पाककृती बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी उपस्थित महिलांनी तृणधान्यापासून बनविलेल्या पारंपरिक पाककृतींबद्दल देवाण घेवाण केली.मिलेट्स ऑफ मंथ या उपक्रमाचा एक भाग म्हणून दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी तालुकास्तरावर बाजरी पासून बनविलेल्या पाककृती यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.त्यामुळे जिल्ह्यात इंदापूर तालुक्याचाच डंका वाजायला हवा त्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे .
शेती शाळेतील एक महिला शेतकरी सौ. प्राजक्ता संतोष तावरे यांच्या शेतातील ब्रोकली लागवड या नावीन्यपूर्ण प्लॉटला भेट देताना त श्री रूपनवर साहेब , श्री. कोकणे साहेब, सूर्यवंशी साहेब आणि शेती शाळेतील महिला शेतकरी.
बाजरीपासून पाककृती बनविताना शेतीशाळाच्या महिला शेतकरी