दि. ६ जून २०२२ रोजी स्वराज्य संस्थापक, विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४९ वा राज्याभिषेक दिन सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक सोहळा हा इंदापूर मधील पुणे- सोलापूर बायपास या ठिकाणी नुकतेच वीरश्री मालोजीराजे भोसले यांचे स्मारक तयार करण्यात आले आहे त्याठिकाणी साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड इंदापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात मराठा सेवा संघाच्या आचारसंहिता नुसार जिजाऊ वंदना गाऊन करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला.कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व उपस्थितांना राष्ट्रमाता जिजाऊ यांचे चरित्र रूपी पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले. तसेच संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष शिवश्री मकरंद जगताप यांची इंदापूर तालुका खरेदी- विक्री संघाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी मालोजीराजे भोसले चौक हा “जय जिजाऊ जय शिवराय तसेच तुमचं आमचं नातं काय… जय जिजाऊ जय शिवराय… छत्रपती शिवाजी महाराज की जय…” या घोषवाक्यांनी दुमदुमून गेला होता.सदर शिवराज्याभिषेक सोहळ्याला जनता एक्सप्रेस चे संपादक शिवश्री श्रीयश नलवडे, युवासेना इंदापूर तालुका प्रमुख शिवश्री सचिन इंगळे, बिजवडीचे सामाजिक कार्यकर्ते शिवश्री बाळासाहेब गायकवाड, फलफले उद्योग समूहाचे संस्थापक शिवश्री ज्ञानेश्वर फलफले, इंदापूर चे युवा उद्योजक शिवश्री अल्केश ढमढेरे, शिवश्री विजय आवटे, इंदापूर तालुका कॉंग्रेस सरचिटणीस शिवश्री निवास शेळके, मराठा सेवा संघ पुणे जिल्हाध्यक्ष शिवश्री राहुल घोगरे, मराठा सेवा संघ इंदापूर शहराध्यक्ष शिवश्री राहुल गुंडेकर, मराठा सेवा संघ इंदापूर तालुका कार्याध्यक्ष शिवश्री महेश कोरटकर, मराठा सेवा संघ इंदापूर शहर उपाध्यक्ष शिवश्री प्रमोद देशमुख, मराठा सेवा संघ इंदापूर शहर कार्याध्यक्ष शिवश्री प्रतिक झोळ, मराठा सेवा संघ इंदापूर शहर प्रसिद्धी प्रमुख पै. शिवश्री राजन पवार, मराठा सेवा संघ इंदापूर शहर संघटक शिवश्री किरण शिंदे, मराठा सेवा संघ संपर्क प्रमुख शिवश्री गणेश रणदिवे, शिवश्री प्रज्वल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शिवश्री सागर भोंग, स्टर्लिंग डांस अकॅडमी चे शिवश्री वाघमारे व शिवशंभू भक्त उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शिवश्री गणेश रणदिवे यांनी तर आभार प्रदर्शन शिवश्री महेश कोरटकर यांनी केले. शिवराज्याभिषेक दिन सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी मराठा सेवा संघ इंदापूर च्या सर्व पदाधिकारी यांनी विशेष सहकार्य केले.