ताटे दांपत्यांचा लग्नाच्या वाढदिवसादिनी अनोखा उपक्रम  

टेम्भुर्णी: रामरत्न मेडीकल, टेंभूर्णी चे प्रो. प्रा .श्री. निलेश ताटे व सौ. पुजा निलेश ताटे या दांपत्यानी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ,अनावश्यक खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना विनामूल्य आरोग्य विषयक सेवा प्रदान केली. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बेंबळे चौक, टेंभूर्णी याठिकाणी मोफत नैत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन,श्री. डाॅ. प्रवीण साखरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले.
प्रमुख पाहुणे म्हणून श्री. नामदेव (महाराज )धोत्रे हे उपस्थित होते.
या आरोग्य विषयक सेवा शिबीरास मंगेश ताटे,विकास धोत्रे ,नवनाथ ताटे,हनुमंत ताटे,प्रंशात ताटे,मुकुंद महालिंगडे,अनिल जगताप ,प्रकाश देशमुख, अतुल नांगरे, दयानंद पवार,सतिश कोळेकर, लक्ष्मण ताटे,रामचंद्र ताटे,पंकज कारंडे देवीदास साखरे दत्तात्रय जाधव इ.मान्यवर उपस्थित होते.
ही विनामूल्य आरोग्य विषयक सेवा पुणे अंधजन मंडळाचे एच .व्ही. देसाई हॉस्पिटल हडपसर, पुणे यांच्या टेंभूर्णी विजन सेंटर मधील कार्यरत आरोग्य सेवक नैत्र चिकित्सक- श्री. अंगद शेंडगे, विजन सेंटर मोबिलाईझर- सागर कोळेकर, विजन सेंटर सहायक- अजय टिपाले यांच्या कडून मोफत प्रदान करण्यात आली.
या आरोग्य विषयक सेवेचा लाभ टेंभूर्णी व परिसरातील 64 पुरूष व 53 महिला अशा एकूण 117 व्यक्तींनी घेतला, या सेवेचा लाभ घेण्यासाठी टेंभूर्णी परिसरातील लोकांनी उस्फूर्त प्रतिसाद नोंदवीला.या विनामूल्य आरोग्य विषयक शिबिरामध्ये ,नैत्र तपासणी, रक्तदाब तपासणी (BP) तसेच रक्तातील साखर तपासणी (BPL) यांचा समावेश होता.
अतिशय शिस्तबद्ध व आनंदमय वातावरणामधे हे शिबिर पार पडले. शिबिराचे आयोजक श्री. निलेश ताटे यांनी उपस्थितांचे व आरोग्य सेवकांचे आभार मानून या विनामूल्य सेवा शिबिराचा समारोप केला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here