वैभव पाटील :प्रतिनिधी 9850868663
दि.11 फेब्रुवारी रोजी चहाडे क्रीडा संकुल येथे कुणबी कबड्डी लीग चे उद्घाटन राजेंद्र गो.पाटील दि .ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते कण्यात झाले. सदर लीग मध्ये एकूण सर्वोत्तम ८ संघानी भाग घेतला. या लीगचे अध्यक्ष.महेंद्र ठाकूर यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. सदर प्रसंगी जिजाऊ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे , दि .ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नागेश पाटील , सामाजिक कार्यकर्ते प्रशांत प्रभाकर पाटील, जिल्हा परिषद सदस्य विनया विकास पाटील, सूर्यवंशी क्षत्रिय हितवर्धक मंडळाचे माजी अध्यक्ष मार्तंड पाटील , सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष महेंद्र सोगल, माजी जि. प .अध्यक्ष शिवा सांबरे,निलेश भोईर वाडा, सुदेश पाटील नागझरी, विकास पाटील निहे असे मान्यवर उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते .
पालघर तालुक्यातील पूर्व भागामध्ये कबड्डी म्हणजे ध्यास आणि कबड्डी म्हणजे श्वास सांगितल तर वावगं ठरणार नाही आणि म्हणूनच तांदुळवाडी गट मागील वर्षापासून लीगचे आयोजन नियोजन करत आहे. या वर्षाचे दुसरे पर्व होते. प्रो कबड्डीच्या धर्तीवर या स्पर्धा भरवल्या जातात.यामधून सर्वोत्तम खेळाडू घडावेत व पुढे महाराष्ट्राचे नेतृत्व करावं या उद्देशाने घ्या स्पर्धा भरवल्या जात आहेत. स्पर्धा पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. तर अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावून शुभ आशीर्वाद देऊन कुणबी लिगचे तोंड भरून कौतुक केले.
सदर स्पर्धेसअनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. पंकज कोरे , मनोज अधिकारी, पंकज शिरसाड अप्पर पोलीस निरीक्षक पालघर , तात्या शेट भिवंडी ,आमदार राजेश पाटील, उत्तम पिंपळे , संदीप पावडे कृषी सभापती, प्रवीण राऊत ,जगदीश धोडी , डॉ विश्वास वळवी, राजेंद्र पाटील ,अश्या अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या समई पंकज शिरसाड अप्पर पोलीस निरीक्षक पालघर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करत असताना म्हणाले की मी ज्या आज पदावर पोचलो आहे ते केवळ आणि केवळ कबड्डी म्हणून खेळल पाहिजे खेळाचा मान आणि सन्मान वाढवला पाहिजे व त्याच बरोबर शिक्षणाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे असा मोलाचा सल्लाला दिला होती. यावेळी अनेक जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,जिल्हा अध्यक्ष युवक मंडळ आजी माझी पदाधिकारी उपस्थित होते.संघ मालक प्रशांत उत्तम यांनी उत्तम आयोजन आणि नियोजन साठी आयोजकांचे कौतुक केले.ह्या स्पर्धा महारष्ट्र कबड्डी असोसिशन चे सदस्य मनोज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने आणि लीगचे विश्वस्त, सल्लागार व अन्य सर्व पदाधिकारी यांच्या अथक प्रयत्नाने तसेंच दाते व मायबाप प्रेक्षक यांच्या आशीर्वादाने , अतिशय आनंदात व उत्साहा मध्ये दोन दिवसांनी पार पडल्या. लीगचे सचिव जितेंद्र दत्तात्रेय पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.
🏆 स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:-
प्रथम क्रमांक-: गावदेवी वॉरीयर्स,लोवरे
द्वितीय क्रमांक-:जीवन ज्योती, हालोली
तृतीय क्रमांक -: पी एस कुणबी किंग, कुडे
चतुर्थ क्रमांक -: साई स्पोर्ट्स,सागावे
मालिकावीर -: राहुल पाटील,चहाडे (गावदेवी वॉरियर्स, लोवरे)
उत्कृष्ट पकड -: विराज ठाकरे,शिलशेत (जिवन ज्योती, हालोली)
उत्कृष्ट चढाई -: अलंकार सातवी, हालोली(जिवन ज्योती, हालोली)
उत्कृष्ट मध्यरक्षक -: कुणाल पाटील, चहाडे(गावदेवी वॉरियर्स, लोवरे)