मोटर सायकल चोरी करणाऱ्या विरुद्ध पंढरपूर गुन्हे शाखेची धडक कारवाई करून आरोपींना जेरबंद केले व त्यांच्याकडून 21,30,000/_ रुपये किमतीच्या एकूण 64 गाड्या जप्त केल्या.पंढरपूर तालुक्यासह विविध जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरून कमी किमती मते विकणाऱ्या आठ चोरांच्या टोळीला पंढरपूर गुन्हे शाखेने धडक कारवाई करून गजाआड करण्यात पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे.टोळीतील सर्वजण पंढरपूर व सांगोला येथील रहिवासी असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 64 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी येथे पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. शहर व ग्रामीण भागात मोटरसायकल चोरीचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले होते.त्यामुळे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदाराची तीन खास पथके नियुक्त केली होती, या पथकाने मोटरसायकली चोरी झालेल्या विविध ठिकाणासह परिसराचे बारकाईने निरीक्षण केले.गोपनीय माहिती संकलित केली.त्यानुसार माग काढत टाकळी बायपास येथे चोरीतील मोटर सायकल विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला शिताफीने ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी आपल्या साथीदारांसह पंढरपूर शहर व परिसरासह सांगली ,कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, बीड या जिल्ह्यातील मोटरसायकली चोरल्याचे सांगितले.त्यानुसार पोलीस पथकाने यातील आठ जणांना अटक केली व 64 मोटरसायकली हस्तगत केल्या असल्याचे पोलीस अधीक्षक सातपुते यांनी सांगितले.जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव,उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम,पोलीस निरीक्षकअरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे,पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय आसबे, सहाय्यक फौजदार राजेश गोसावी,हवालदार बिपिन ढेकदम,शरद कदम,पोलीस नाईक सचिन इंगळे,सुनील बनसोडे,दादा माने,राकेश लोहार,शोएब पठाण,सुजित जाधव,समाधान माने,तसेच सायबर शाखेचे पोलीस कॉन्स्टेबलअन्वर आतार यांनी ही कामगिरी केली.