तब्बल दीड वर्षानी शाळेची घंटा खणाणली…शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षक , पालक , पदाधिकारी यांचेकडून विविध प्रकारे स्वागत.

इंदापूर प्रतिनिधी:दि ६ रोजी कोरोना महामारीमुळे तब्बल दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा राज्य शासनाच्या आदेशान्वये इंदापूर तालुक्यातील इ १ ली ते ४ थीच्या सर्वच शाळा सुरू झाल्या. कोरोना काळात आॕनलाईन / आॕफलाईन , ओसरी वर्ग अशा विविध माध्यमातून शिक्षण सुरू होते. आज प्रथमच शाळेत मुलांचा प्रवेश झाला. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेतील शिक्षक , पालक , अधिकारी व पदाधिकारी यांनी मुलांना मास्क , गुलाबपुष्प , फुगे , लेखण साहित्य , चाॕकलेट , गोड खाऊ देवून स्वागत केले. महिला शिक्षिकांनी मुलांचे औक्षण केल्याने मुले खूप आनंदून गेली. अतिशय उत्साहवर्धक वातावरणात शाळेत मुले दाखल झाली.पालकांना शाळा सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सुचना दिल्या असून शाळा , वर्ग , परिसर स्वच्छता करणे , मास्क , सॕनिटायजर वापर करणे , एका वर्गात १५ ते २० मुलांना बसवणे , एका बाकावर एक विद्यार्थी बसवणे , शाळेत हात धुण्यासाठी साबण , हॕण्डवाॕश वापर करणे , शिक्षकांनी RTPCR टेस्ट करणे , मुले व शिक्षक यांचे व्यक्तिरिक्त इतरांना शाळेत प्रवेश देवू नयेत. वरील सुचनाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.असे सांगितले आहे.शाळा सुरू झाल्याने मुले , पालक , शिक्षक यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.पालकांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले.मुलांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्याचे मोठे आव्हान शिक्षक आणि पालकासमोर आहे. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here