इंदापूर: राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ फेडरेशन व कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर यांच्यावतीने युवतींसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्या व्याख्यानाचे व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन जिजाऊ फेडरेशनच्या कार्याध्यक्षा व इसमाच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या की तणाव मुक्त जीवन आणि पोष्टिक आहार आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे.अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या की,’ स्पर्धेच्या युगात देखील आपण ताण-तणावाचे योग्य नियोजन करावे. व्यायामामुळे सकारात्मक ऊर्जा तयार होते.मनाला सकारात्मक ऊर्जा दिली तर आपण चांगले विचार करून आपली कार्यात्मक सिद्धता आत्मसात करू शकतो. सेंद्रिय पद्धतीचा आरोग्यदायी आहार,घरच्या घरी बनवलेले पदार्थ तसेच आयुर्वेदिक परंपरेची आदर्श जीवन पद्धती आत्मसात करण्यासाठी आपण प्राधान्य द्यावे. विद्यार्थिनींनी मेडिटेशन ( ध्यानधारणा ) यासाठी अधिकचे प्राधान्य द्यायला हवे.
‘मुलींचे आरोग्य आणि व्यक्तिमत्व’ या विषयावर बोलताना स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कल्पना खाडे म्हणाल्या की आपला हिमोग्लोबिन (HB) चांगला राहण्यासाठी योग्य आहार, व्यायाम, विश्रांती याला अधिक महत्त्व आहे.शरीर मन यांची सुदृढता म्हणजे आरोग्य होय. यावेळी त्यांनी स्त्री आरोग्यासंबंधी आवश्यक असणाऱ्या आरोग्य संबंधीची माहिती दिली.सोशल माध्यमाचा योग्य व मर्यादित वापर करण्याचा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला. ‘आयुर्वेद आणि दिनचर्या ‘या विषयावर बोलताना डॉ. अश्विनी ठोंबरे म्हणाल्या की ,’ आपली दिनचर्या योगा , प्राणायाम , मेडिटेशन अशी असली पाहिजे यातून शरीर प्रसन्न राहते. अनेक आजारापासून आपण दूर राहतो. स्त्री हा कुटुंबाचा कणा आहे . आपण व्याधीमुक्त आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असले पाहिजे.सकाळी लवकर उठणे व रात्री लवकर झोपणे आवश्यक आहे . मानसिक आरोग्य चांगले असेल तर शारीरिक आरोग्य देखील चांगले राहते.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन सरवदे, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर , क्रीडा संचालक डॉ.भरत भुजबळ , उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा पूजा शिंदे -ढमढेरे उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रज्ञा लामतुरे यांनी केले.पाहुण्यांची ओळख डॉ. मनीषा गायकवाड यांनी करून दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका मृदल कांबळे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्राध्यापिका कल्पना भोसले यांनी मानले.