इंदापूर: वाहन परवाना (लायसन्स) कॅम्प इंदापुर मध्ये पुन्हा एकदा चालू करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट तालुकाध्यक्ष शिवराज पवार तसेच शहराध्यक्ष अशोक देवकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तहसीलदार इंदापूर यांना एक निवेदन दिलेले आहे हे निवेदन नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्याकडे देण्यात आले या निवेदनात असे म्हणाले आहे की,आपल्या इंदापूर तालुक्यातील लोकांची गैरसोय होऊ नये याकरिता उपप्रादेशिक वाहन अधिकारी बारामती यांनी इंदापूर येथे परवाना मिळण्यासंदर्भातले कॅम्प दर बुधवारी आयोजित करण्यात येत होते असे आयोजन गेली 20 वर्षापेक्षा जास्त वर्षे इंदापूरच्या इरिगेशन कॉलनी मध्ये आयोजित करून इंदापूर तालुक्यातील लोकांची गैरसोय टाळली जात होती.परंतु कोरोणाच्या महाभयंकर महामारी मुळे व संसर्ग टाळण्याकरिता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती व शासनाने इंदापूर येथील सदरचे कॅम्प बंद केलेले आहेत व यामुळे वाहनधारकांना बारामती ला हेलपाटे घालावे लागत आहेत गेल्या आठवड्यामध्ये हाच परवाना मिळवण्यासाठी एक इंदापुरातील इसम बारामती ला जाण्यासाठी निघाला असता त्याचा ऊस ट्रॅक्टर बरोबर अपघात झालेला नुकताच कानावर आलेला आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसात लोकांचे अपघात टाळावेत व बारामती ला जाणे येणे हे परवडणारे नसल्याने सदरचे कॅम्प पुन्हा एकदा चालू करण्यात यावे व सुरुवातीचे किमान सहा महिने हा कॅम्प आठवड्यातून 2 वेळा आयोजित करण्यात यावेत अशी तमाम इंदापूर तालुक्यातील जनतेची भावना आहे व आपण एक कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याने आम्हाला आपल्याकडून अपेक्षा आहे तरी सदर चे कॅम्प आठवड्यातून दोन वेळा पुढील आठवड्यापासून चालू व्हावेत हीच अपेक्षा असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी उपस्थित योगेश गुजर, बालाजी पाटील,गणेश व्यवहारे, शुभम जगताप,अजय पारसे, राहुल देवकर, प्रतीक सागर,स्वप्निल केंगार, इंद्रजीत गोरे, साजन ढावरे, अनिल ढावरे, समिर मोमिन इत्यादी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या कार्यकर्त्यांनी निवेदनात सह्या करून हे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले .खरं तर सर्व शाळा असतील शासकीय ऑफिसेस असतील पूर्ववत झाले आहेत असे असताना इंदापूरकर यांना बारामतीला वाहन परवाना काढण्यासाठी जावा लागते त्यामुळे आज दिलेल्या निवेदनाची दखल प्रशासकीय स्तरावर जर झाली तर इंदापूरकरांना बारामतीला लायसन्स काढायला जावे लागणार नाही व इंदापूरकरांची हेळसांड थांबेल त्यामुळे सदरची मागणी ही इंदापूर करांसाठी लक्षवेधी आहे हे मात्र नक्की…