डोहोळेपाडा शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन जल्लोषात साजरा

वैभव पाटील :प्रतिनिधी 9850868663
जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा,केंद्र कोशिंबी,ता.भिवंडी येथे 3 जानेवारी 2023 रोजी स्त्री शिक्षिका ,भारतीय पहिल्या मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनाचे आयोजन करण्यात आले.
प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेला प्रमुख मार्गदर्शिका मा.इच्छा जाधव मॅडम यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.सहशिक्षिका दिलशाद शेख मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांचे वंदन गीत सादर करून काव्यसुमनाने वंदन केले.
जयंती निमित्त उपस्थित मुली,महिला यांना पुस्तक व गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत सत्कार सन्मान करण्यात आले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शिका मा. इच्छा जाधव मॅडम (M .A.L L B) यांनी सावित्रीबाई फुले व त्यांच्या जीवनातील प्रसंग या विषयावर सविस्तर प्रबोधनपर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी पेशवाईमधील स्त्री व आजची आधुनिक स्त्री यांची तुलना करत सांगितले की,आजची स्त्री केवळ सावित्रीबाईमुळे घडली आहे. सावित्रीबाईंनी शिक्षण दिले म्हणून आजची प्रत्येक जाती धर्मातील स्त्री शिकून उच्च पदावर विराजमान आहे.परंतु खंत ही आहे की आजची स्त्री सावित्रीबाईना विसरली आहे. म्हणून मुलींनो तुम्ही सावित्रीबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तिने आपल्यावर केलेल्या अनंत उपकाराची परतफेड करा.
मुलींनी सावित्रीबाईंची वेशभूषा साकारली तसेच नृत्य सादर करत आनंद द्विगुणित केला. व सुंदर आकर्षक रांगोळ्या काढून शालेय परिसर सुशोभित करण्यात आला.
सावित्रीबाईफुले जयंतीनिमित्त मा.इच्छा जाधव मॅडम व त्यांचे पती पंकज जाधव यांचे कडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले या लेखन साहित्य वाटप प्रसंगी शिका ,संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश दिला.
संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी अतिशय बहारदार शैलीत केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शक मा.इच्छा जाधव मॅडम, ग्रामपंचायत डोहोळे कार्यालयातील मा.निशा पाटील मॅडम, मंजुळा फापे,अंजना वाघे,पूनम वाघे,शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू मोरे,माजी अध्यक्ष अशोक म्हसकर, मुख्याध्यापक जगदीश जाधव, सहशिक्षक अशोक गायकवाड सर, सहशिक्षिका दिलशाद शेख मॅडम तसेच किशोरवयीन मुली,महिला,विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here