डॉ.कदम गुरुकुल इंदापूर येथील 14 वर्षे वयोगटाच्या(मुले/मुली) बेसबॉल संघाची बीड येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ऐतिहासिक विजय 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, बीड द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धा सन 2022-23 आयोजन बीड जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी केले होते. दि. 19 ते 21 एप्रिल 2023 रोजी 14 वर्षे(मुले) वयोगटामध्ये पुणे विभागीय संघाचे नेतृत्व करीत असलेल्या डॉ. कदम गुरुकुल इंदापूर मुलांच्या संघाने प्रथम फेरीत कोल्हापूर विभागीय संघाचा 5/0 ने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये नाशिक विभागीय संघाचा 3/1 ने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.अंतिम सामना हा पुणे विभाग विरुद्ध छत्रपती संभाजीनगर विभाग संघ या संघामध्ये खूप चुरशीची लढत होऊन पुणे विभागीय संघाने छत्रपती संभाजीनगर विभाग संघाचा 6/2 एक डाव राखून पराभव करून राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये दमदार सुरुवात करून सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकाविले. बेसबॉल चा उत्कृष्ट खेळाडू सन 2022-23 चा व्यंकटेश जयवंत शेटे व ओम बालाजी आडसुळे या दोघांचा सुहासिनी देशमुख जिल्हा क्रीडा अधिकारी बीड व सुहास पाटील उपसंचालक क्रीडा व युवक सेवा छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजी नगर यांनी सन्मान केला. या संघामध्ये असणारे खेळाडू डॉ.कदम गुरुकुल मधील प्रशस्त मैदानावरती वर्षभर सराव करीत असतात. या स्पर्धेतील विजयी खेळाडू रिदान हरून मुलाणी, व्यंकटेश जयवंत शेटे, नविश नंदकुमार यादव, शिवराज पांडुरंग शेरकर, वेदांतराजे चंद्रदीप साळुंखे, तेज तानाजी कचरे, यश सुरेश शिंदे, चेतन धनंजय बनकर, वेदांत ज्ञानेश्वर देवकर, वेदांत लक्ष्मण सपकाळ, ओम बालाजी आडसुळे, रविराज नवनाथ पवार, यश सूर्यकांत साळुंके, राजीव देवराज दुटाळ, पृथ्वीराज संगमेश्वर कांबळे, श्रेयश सचिन काळे या खेळाडूंचे आणि मार्गदर्शक क्रीडाशिक्षक सोमनाथ नलवडे यांचे पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे साहेब,इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले साहेब यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. एल. एस. कदम सर संस्थेच्या शैक्षणिक संचालिका डॉ. सविता कदम मॅडम,सचिव नंदकुमार यादव सर,गुरुकुलच्या प्राचार्या वृंदा मुलतानी जोशी, उपप्राचार्य ऋषी बासू, स्कूल मॅनेजर संदीप जगताप सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here