डिकसळ ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एकहाती वर्चस्व-उपसरपंच पदी राष्ट्रवादीचे संदीप भोंग बिनविरोध.

भिगवण परिसरातील महत्वपूर्ण समजल्या जाणा-या डिकसळ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत पॅनेलने भाजपाचा पराभूत करून घवघवीत यश मिळवले आहे.गावच्या लोकनियुक्त सरपंच पदी सौ.मनिषा संदिप गवळी तर उपसरपंच पदी श्री.संदीप साधु भोंग यांची निवड झाली आहे.या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे सरपंच पदासह 9 पैकी तब्बल 8 उमेदवार जिंकून आले असून विरोधी गटाला अवघी 1 जागा मिळाली आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीच्या दरम्यान रावसाहेब गवळी,आबासाहेब हगारे,शिवाजी पवार,जिजाराम पोंदकुले,कैलास कुंभार,संपत पवार,लक्ष्मण कुंभार,अजिनाथ भोंग,हेमंत कुंभार,निलेश मोरे,भास्कर काळे,बापूराव झाकणे,महेंद्र सवाणे आदी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवत सरपंच पदी मनिषा संदीप गवळी मोठ्या मताधिक्याने निवडूण आणले,तर काल पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये संदीप भोंग यांना बिनविरोध निवडून आणून राष्ट्रवादीची ताकद दाखवून दिली आहे.उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर बोलताना नवनिर्वाचीत सरपंच व उपसरपंच यांनी सांगितले की,मा.ना.दत्तात्रयमामा भरणे यांच्या माध्यमातून गावामध्ये कोट्यावधी रूपयांची विकासकामे झालेली आहेत,आदरणीय दत्तामामांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचा हाच वेग कायम ठेवण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here