डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या उर्वरित कामासाठी १ कोटी ५० लक्ष निधी देणार – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा

इंदापूर : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीच्या निमित्ताने शहरातील डाॅ.आंबेडकरनगर येथे आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या उर्वरित कामासाठी १ कोटी ५० लाख रूपयांचा निधी तात्काळ मंजूर केला जाईल अशी घोषणा करीत या कामासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी या संदर्भातील प्रस्ताव देण्याच्या सुचना केल्या आहेत.
इंदापूर तालुक्यात आणि शहरात विकास कामांवर भर दिला असून आंबेडकर नगर परिसरातील नागरिकांच्या समस्यांकडे माझे जातीने लक्ष असते. मी स्वतः अनेक वेळा आंबेडकरनगर परिसरात भेटी दिल्या आहेत.या परिसरातील विविध विकास कामांकरिता मागील काही दिवसापूर्वीच २ कोटी ७९ लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे.यापुढे देखील या परिसरातील विकास कामांकरिता आपण कटीबध्द असल्याची ग्वाही मंत्री भरणे यांनी यावेळी दिली.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हे फक्त एका समाजापुरते मर्यादित नसून ते अखंड विश्वासाठी प्रेरणा आहेत.असे म्हणत त्यांनी उपस्थितांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, अँड.राहुल मखरे, तहसिलदार श्रीकांत पाटील,मुख्याधिकारी रामराजे कापरे,पोलीस निरीक्षक टी.वाय मुजावर,सहा पो.निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे,प्रभागाच्या नगरसेविका राजश्री मखरे ,माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे,आरपीआय पुणे जिल्हा संघटक सचिव शिवाजीराव मखरे,आरपीआय चे तालुकाध्यक्ष संदीपान कडवळे,बाळासाहेब सरवदे,नगरसेवक पोपट शिंदे,स्वप्निल राऊत,वसंतराव मालुंजकर, बाळासाहेब मखरे,अमर गाडे,अनिकेत वाघ ,धनंजय बाब्रस श्रीधर बाब्रस
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटीचे अध्यक्ष अँड.किरण लोंढे,खजिनदार सुरज मखरे,उपाध्यक्ष महेश सरवदे,शेखर मखरे, अक्षय मखरे यांसह जयंती कमिटीचे पदाधिकारी व सर्व समाज बांधव उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here