इंदापूर: आज मा.डाॅ.निलमताई गो-हे विधानपरिषद उपसभापती महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते आनंद कृषी महोत्सव कृषी प्रदर्शनाच्या मुख्य पत्रकाचे अनावरण करण्यात आले शिवसेना पुणे जिल्हा व विकासधारा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मा.श्री.विजयबापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली व अँड सौ गीतांजली ताई ढोणे यांच्या सूचनेनुसार इंदापूरमध्ये राज्यस्तरीय आनंद कृषी महोत्सव कृषी, औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शन होणार आहेत.या प्रदर्शनाच्यानिमित्ताने इंदापूर मध्ये स्ट्रक्चर मंडप उभारणी करण्यात येणार असून प्रदर्शनातील सर्व स्टॉल प्रीफाब्रिकेटेड स्वरूपाचे असणार आहेत.प्रदर्शनास जिल्ह्यातील २ लाख शेतकरी भेट देतील.या प्रदर्शनाचा मुख्य उद्घाटन सोहळा दि. 27 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते होईल.गाय, बैल स्पर्धा, डॉग शो व बक्षीस वितरण सोहळा प्रदर्शनाच्या निमित्ताने इंदापूर येथे कृषि क्षेत्रातील नामांकित कंपन्यांची उत्पादने लावण्यात येणार असून याशिवाय शेतकरी ते ग्राहक थेट विक्री अंतर्गत आत्मा योजनेमार्फत निवड करण्यात आलेल्या विविध शेतकऱ्यांच्या सेंद्रिय शेतमालउ त्पादनांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.स्वागताध्यक्ष आण्णा काळे युवक अध्यक्ष शहर प्रमुख अशोक देवकर शिवसेना महिला अध्यक्षा रूपालीताई रासकर निर्मलाताई जाधव ज्योती शिंदे,सोनम खरात युवा सेना पदाधिकारी यांच्या संयुक्त कमिटी स्थापन करण्यात आलेल्या आहेत.
Home Uncategorized डाॅ.निलमताई गो-हे यांच्या हस्ते इंदापूर येथे होणाऱ्या आनंद कृषी महोत्सवाच्या मुख्य पत्रकाचे...