ठेकेदाराला काळ्या यादीत घालून त्याच्याकडून रस्ता दुरुस्त करा अन्यथा….या शिवसेनेच्या गर्जेनेला सार्वजनिक बांधकाम विभाग नमले. निमगाव ते शेटफळ रस्ता प्रकरण.

🔹इंदापूर तालुक्यातील सर्वात घाणेरडा रस्ता शेटफळ हवेली ते निमगाव केतकी असा असल्याचा तालुकाप्रमुख यांचा दावा.
🔹रस्ते विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये कोणाच्या खिशात?

इंदापूर :इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी ते शेटफळ हवेली या रस्त्याच्या झालेल्या दुर्दशा झाल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी 20 सप्टेंबर रोजी उपविभागीय सार्वजनिक बांधकाम कार्यालय इंदापूर यांना एक निवेदन देण्यात आले होते या निवेदनात शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी असे म्हटले होते की,शेटफळ हवेली ते निमगाव केतकी रोडचे काम गेल्या वर्षी झाले असुन सदर रस्ता मुख्य रहदारीचा असून रेडा,रेडणी,काटी,वरकुटे,रामकुंड,शेटफळ हवेली इ . ठिकाणाहुन शेतकरी व्यापारी मालाची ने आण करीत असतात. रोडचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे .त्या ठिकाणी कुठेही डांबर नावाला राहिलेले नाही तसेच संपुर्णपणे रोड उदसण्यास सुरवात झाली आहे व खडी वाहेर येवुन रस्त्याला मोठ मोठे खडडे पडलेले आहेत .काही ठिकाणी तर खडडे पडुन त्या खडडयामध्ये अपघात झाले आहेत व काही जनांचे प्राणही गेले आहेत.आम्ही यापुर्वीही अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी आपणाकडे केलेल्या आहेत त्या आपणास अवगत आहेत .

एवढा घाणेरडा रस्ता इंदापुर तालुक्यात याच्या पुर्वी कधीही झालेला पाहिला नाही.शासनाने रस्त्यासाठी कोटयावधी रूपये मंजुर केले परंतु संबधीत ठेकेदाराने मात्र पैमा खिशात घातला.कामामध्ये पाहिजे त्या प्रमाणात डांबर वापरले नाही तसेच रस्त्याची दवाई केली नाही.लागते त्या प्रमाणात मटेरियल वापरले नसल्यामुळेच रस्त्याची दुरावस्था झाली आहे सदर ठेकेदाराचे नाव काळया यादीत टाकुन तो रस्ता संबधीत ठेकेदाराकदुन आपल्या स्तरावर त्वरीत करून घेण्यात यावा .अन्यथा आपल्या कार्यालयासमोर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल याची दखल आपल्या स्तरावर घेण्यात यावी .अशा प्रकारे निवेदनात घणाघात केला होता या निवेदनाची दखल घेत प्रशासनाने त्याची तात्काळ दखल घेऊन शासकीय स्तरावर ती संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ काम चालू करण्यास सांगितले व संबंधित अधिकाऱ्यांनी शिवसेना तालुकाप्रमुख यांना तात्काळ काम चालू केल्या बद्दल ची माहिती फोन वरून व मेसेज वरून शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांना दिली. काल सकाळ पासून या रस्त्याचे काम चालू असल्याचे निदर्शनास आले.


आगामी काळात तालुक्यात कोणत्याही गावाचा रस्ता हा निकृष्ट दर्जाचा केला तर ठेकेदाराने त्याच्या स्वखर्चाने तो दुरुस्त करून घेत त्याला काळे यादीत टाकण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे नितीन शिंदे यांनी यावेळी सांगितले. एकंदरीतच शिवसेनेच्या या पाठपुराव्याला यश जरी आले असेल तरी शेटफळ हवेली हे इंदापूर तालुक्यातील एकमेव असे गव आहे की या गावात जाण्यासाठी गावाच्या चारही बाजूने येणारे रस्ते हे निकृष्ट दर्जाचा असून वाहतुकीस योग्य नाहीत वस्तुस्थिती नाकारता येणार नाही शेटफळ हवेली येथील नवले वस्तीवर जाणारा रस्त्याचे उद्घाटन होऊन गावच्या घाणेरड्या राजकारण प्रणालीमुळे हा निधी परत गेला आहे हे सुद्धा गावकऱ्यांनी पाहिले आहे.मग आता या रस्त्याचे काम कधी चालू होणार याकडे शेटफळकरांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना इंदापूर तालुकाप्रमुख नितीन शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जलतज्ञ बाळासाहेब करगळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खजिनदार किशोर शिंदे हे सुद्धा याच गावातील असून या शेटफळकरांच्या मागणीसाठी शिवसेनेच्या माध्यमातून व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून काम पूर्ण व्हावे तसेच कागदपत्री मंजुरीच्या बनवाबनवी पेक्षा प्रत्यक्षात कामाला सुरुवात करावी ही गावकऱ्यांची मागणी आहे



 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here