ठाकरे सरकारकडून कडक निर्बंध लागू- वाचा सोप्या भाषेत याबाबतची नियमावली.

राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, ओमायक्रानचेही संकट दिवसेंदिवस अधिकच गहिरे होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे आज काही महत्त्चाचे निर्णय जाहीर केले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची वाढती स्थिती लक्षात घेऊन,ठाकरे सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत.सरकारच्या आदेशानुसार येत्या 10 जानेवारीपासून हे नवे निर्बंध लागू होणार आहेत.त्यात लग्न समारंभापासून सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांतील लोकांच्या उपस्थिंतीवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात अखेर नाईट कर्फ्य्‌चा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत राज्यात ‘नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आला असून,उद्या (ता. 9) मध्यरात्रीपासूनच त्याची अमलबजावणी केली जाणार आहे.
👉काय सुरु काय बंद..?
राज्यातील शाळा कॉलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंदच राहतील.दहावी बारावीच्या कोचिंग क्लासेससाठी सूट दिली आहे. इतर सर्व कोचिंग क्लासेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद असतील. हे क्लासेस ऑनलाईन सुरु असतील. सरकारी कार्यालयांसाठी 50 टक्‍के उपस्थिंतीची अट असेल. राज्यात दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी असेल, अत्यावश्यक सेवांसाठी मुभा दिली आहे.
👉मैदाने, उद्याने आणि पर्यटन स्थळे पूर्णत: बंद करण्यात आली आहेत.
👉सलून 50 टक्‍के क्षमतेने सुरु राहतील.
👉राज्यातील थिंएटर 50 टक्के प्रेक्षक क्षमतेने सुरु राहतील.
👉हॉटेल,रेस्टारंट 50 टक्के क्षमतेने रात्री 10 वाजेपर्यंतच सुरु ठेवता येतील
👉स्विमिंग पूल, स्पा, जिम पूर्णत: बंद राहतील.
👉राज्यात दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली असून, दिवसा 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.
👉रात्री फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.
👉परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना 72 तास आधीचा “आरटीपीसीआर’ रिपोर्ट सादर करावा लागणार.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here