ज्वारी पिकाचे एकात्मिक कीड नियोजन करा- श्री भाऊसाहेब रुपनवर तालुका कृषी अधिकारी इंदापूर.

बळपुडी येथे कृषि विभागामार्फत ज्वारी पिकावरील शेतक-यांची शेतीशाळा संपन्न
इंदापूर: आज दिनांक 22/12/2021 रोजी मौजे- बळपुडी तालुका – इंदापूर जिल्हा- पुणे येथे कृषी विभागामार्फत ज्वारी पिकावरील शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी इंदापूर तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री. भाऊसाहेब रुपनवर यांनी ज्वारी पिकाचे एकात्मिक किड नियंञण करण्याविषयी शेतक-यांना मार्गदर्शन केले. तसेच शहरांमधील सोसायटीला थेट धान्य विक्री करणेबाबत आवाहन केले. त्याच बरोबर ज्वारी प्रक्रिया उद्योग, मका प्रक्रिया उद्योग, ऊस उत्पादन तंञज्ञान याबाबत माहिती दिली .ते पुढे म्हणाले कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा शेतकरी बांधवांनी लाभ घेतला पाहिजे . या योजनांमध्ये महाडीबीटी अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण कृषी अवजारे, ट्रॅक्टर, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, पीक प्रात्यक्षिके, ज्वारी, गहू, हरभरा या पिकाचे पायाभूत बियाणे इत्यादी बाबींचा शेतकरी बंधुंनी लाभ घ्यावा.
या कार्यक्रमाप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी श्री. आबासाहेब रुपनवर यांनी ज्वारी पिकावरील एकात्मिक किड नियोजन यासाठी कामगंध सापळ्यांच्या वापराबाबत माहिती दिली. या शेती शाळेमध्ये परिसरातील प्रताप गाढवे, प्रमोद गाढवे, प्रकाश गाढवे, उत्तम गाढवे, सुनील गाढवे, जयपाल साळवे, महादेव चोरमले, गोरख चोरमले, गोरख काळे, लालासो काळेल यांसह इतर शेतकरी उपस्थित होते.
कृषी सहाय्यक हनुमंत बोडके, वैभव अभंग व कृषी पर्यवेक्षक विलास बोराटे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले 
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here