सध्याच्या युगात वाढदिवसानिमित्त हजारो रुपये खर्च केले जातात व पैशाचा व वेळेचा अपव्य केला जातो असे म्हणतात परंतु समाजात अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्या उदाहरणातून वाढदिवस नेमका कसा साजरा करावा यातून चांगला धडा शिकायला मिळतो. याचेच एक उत्तम उदाहरण आज इंदापूरमध्ये पाहायला मिळाले.
आज ज्ञानेश्वरी तुकाराम बानकर या BCA चे पुण्यात शिक्षण घेत असलेल्या युवतीचा वाढदिवस आहे. ज्ञानेश्वरीचे वडील तुकाराम बानकर हे इंदापूर मधील सुप्रसिद्ध सोन्या – चांदीचे व्यापारी आहेत. ज्ञानेश्वरीने आपल्या वाढदिवसाला अनावश्यक खर्च न करिता समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी व युवक युवतींसाठी एमपीएससी यूपीएससी विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सोयीस्कर होण्याच्या कारणातून व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अभ्यासिका या दोन्ही ठिकाणी पुस्तके देऊन आपला वाढदिवस साजरा केला.
ज्ञानेश्वरीच्या या आगळ्यावेगळ्या संकल्पनेचे कौतुक करत असताना माजी नगराध्यक्षा अंकिता भाभी शहा म्हणाल्या की ,”खरंच ज्ञानेश्वरीने आपल्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या ग्रंथसंपदेमुळे समाजातील जे गरजू विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या पुस्तकांचा त्यांच्या अभ्यासासाठी नक्कीच उपयोग होणार आहे. ज्ञानेश्वरीच्या या आदर्शवत समाज हित उपयोगी उपक्रमाचे करावे तितके कौतुक थोडेच आहे.”
या अनोख्या उपक्रमाबद्दल ज्ञानेश्वरी बानकर हिने सांगितले की,” समाजात अनेक युवक युवकांमध्ये टॅलेंट लपलेले आहे. अनेकांना पुढे जाण्याच्या संधी आहेत परंतु घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना पुस्तके खरेदी करता येत नाहीत त्यामुळे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना अपेक्षित निकाल त्यांच्या हाती लागत नाही त्यामुळे मी यापुढे प्रत्येक वाढदिवसाला लोकहिताचे काम करण्याचे ठरवले आहे आणि याचाच भाग म्हणून आज दोन्ही वाचनालयास पुस्तके भेट दिली आहेत.”डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयास नगराध्यक्षा अंकिता भाभी शहा व नगरपालिकेचे मुख्याधिकारी राम कापरे यांच्या हस्ते पुस्तके देण्यात आली यावेळी मुकुंद शेठ शहा, अरविंद तात्या वाघ, शिवाजीराव मखरे, संदिपान कडवळे, बाळासाहेब सरवदे, अशोक मखरे तर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे अभ्यासिका येथे माजी नगराध्यक्ष विठ्ठलआप्पा ननवरे,दादासाहेब सोनवणे,सुधीर मखरे,राजेश शिंदे यांच्या हस्ते पुस्तके देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम बानकर यांनी केले तर आभार माजी नगराध्यक्ष दादासाहेब सोनवणे यांनी व्यक्त केले. जनता एक्सप्रेस मराठी न्यूजच्या वतीने ज्ञानेश्वरीस वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!!!
Home Uncategorized व्वा.. ज्ञानेश्वरी..! ज्ञानेश्वरीने वाढदिवसानिमित्त केलेला उपक्रम समाजपयोगी,समाजातील गरजूंना यामुळे नक्कीच फायदा –...