“जैन जगेगा तभी.. सर्वोच्च तीर्थ बचेगा ” या घोषणेसह इंदापूर तालुक्यातील सकल जैन समाजाने शिस्तबद्ध पद्धतीने काढला निषेधार्थ मोर्चा.

झारखंडमधील गिरिडीह येथील समेद शिखरजीला पर्यटन स्थळ करण्याची अधिसूचना जारी केल्यानंतर जैन समाजाचे लोक रस्त्यावर उतरले आहेत. समेद शिखरजी हे आपले पवित्र तीर्थक्षेत्र असल्याचे सांगून जैन समाजातील लोक विरोध करत असून ते जतन करण्याची मागणी करत आहेत.
या विरोधात अनेक राज्यात आंदोलन होत असून याचे परिणाम आता इंदापूर तालुक्यातही दिसून आला.आज बुधवार दिनांक 21 डिसेंबर रोजी इंदापूर तालुक्यातील समस्त सकल जैन समाज यांनी एकत्र येऊन अतिशय शांतिमय वातावरणात आणि शिस्तीत शासनाच्या या अधिसूचनेच्या निषेधार्थ जाहीर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये इंदापूर तालुक्यातील विविध गावातून शेकडो जैन समाज हा इतिहासात पहिल्यांदाच रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळाला.इंदापूर शहरातून जुन्या कचेरी शेजारील जैन मंदिरापासून निघालेला हा निषेध मोर्चा मेन पेठ – पंचायत समिती – बाबा चौक मार्केट कमिटी मार्गे तहसील ऑफिसला अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पोहोचला होता.शिस्तबद्ध पद्धतीने काढलेल्या या निषेध मोर्चाचे आणखी वैशिष्ट्ये या मोर्चामध्ये शेकडो महिला व बालके सामील झाले होते.जैन धर्मीयांचेही म्हणणे आहे की, जर याला पर्यटन क्षेत्र बनवले तर पर्यटकांच्या येण्याने येथे मांसाहार आणि दारूचे सेवनही होईल.पवित्र तीर्थक्षेत्र परिसरात अहिंसावादी जैन समाजासाठी अशी कृत्ये असह्य आहेत. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत मत्स्य आणि कुक्कुटपालनालाही परवानगी देण्यात आली आहे.जैन धर्मात समेद शिखरजींबद्दल अशी श्रद्धा आहे की ज्याप्रमाणे गंगेत स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात, त्याचप्रमाणे त्यांची पूजा केल्याने सर्व पापे नष्ट होतात. जैन समाजाचे लोक समेद शिखरजी येथे 27 किलोमीटरच्या परिघात पसरलेल्या मंदिरांना भेट देतात आणि प्रार्थना करतात. जैन धर्माचे लोक पूजेनंतरच अन्नसेवन करतात. समेद शिखरजींच्या या परिसराचा प्रत्येक कण पवित्र आणि पूजनीय आहे, अशी जैन समाजाची श्रद्धा आहे. या प्रदेशातून लाखो जैन मुनींनी मोक्ष मिळवला आहे. सरकारने इतर धर्मीयांच्या तीर्थस्थळांचे जसं संरक्षण केले आहे, त्याचप्रमाणे समेद शिखरजींनाही संरक्षण मिळावे व सम्मेद शिखरजींनाही केवळ धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी जैन समाजातील बांधव करत आहेत.इंदापूर तालुक्यात प्रथमच सकल जैन समाज हा रस्ता उतरला होता या समाजातील लोकांनी आपली दुकाने बंद करून केंद्र शासनाच्या काढलेल्या या जीआर विरुद्ध निषेध नोंदवला आहे.या निषेध मोर्चामध्ये रोटरी क्लबचे नरेंद्रभाई गांधी,डॉ. श्रेणिक शहा, ॲड.अशोक कोठारी,डॉ.सागर जोशी,धरमचंद लोढा, प्रकाश बलदोट्टा,बागेरेचा शेठ, संजय बोरा, जवाहर बोरा, मिलिंद दोशी, संतोष व्होरा, डॉ.विकास शहा, वैभव दोशी, विपुल व्होरा, पुष्कर गांधी, सिद्धांत दोशी,निलेश बोरा,विलास मेहता,साजन चंकेश्वरा,भारत गांधी इत्यादी आंदोलकांसह शेकडो महिलाही या निषेध मोर्चात सामील झाल्या होत्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here