जि.प.सदस्य अभिजित तांबिले यांच्या पुढाकारातून १० लाख रुपयांच्या कचरा पेट्यांचे वितरण.

कचरापेट्यामुळे नियोजितपणे कचरा संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्यास मदत होणार असल्याने या गटात समाधान
इंदापुर: ग्रामीण भागातील कचरा विघटन व वर्गीकरण करण्यासाठी तसेच आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेचे महत्व असल्याने जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांनी जागतिक आरोग्य दिनाच्या पूर्वसंध्येला १० लाख रुपये निधीच्या कचरा पेट्या उपलब्ध केल्या आहेत. प्रत्येक गावातील शाळा, मंदिरे, आरोग्य केंद्रे, प्रमुख चौक अशा सार्वजनिक ठिकाणी एकूण १० कचरा पेट्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत जेणेकरून गावातील कचऱ्याचे सुनियोजित पद्धतीने संकलन करून त्याचे विघटन करणे सोपं जाईल.
या कचरा पेट्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वडापुरी गावात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा गारटकर यांच्या उपस्थितीत औपचारिकरित्या देण्यात आल्या.
या बाबत अभिजित तांबिले म्हणाले की,”माझ्या जिल्हापरिषद गटातील सर्वच गावात कचऱ्याचे संकलन करण्यासाठी १० लक्ष रुपयांच्या कचरा पेट्या उपलब्ध करण्यात आल्या. या कार्यक्रमानुसार औपचारिकरित्या वडापुरी गावांतील मंदिर, शाळा, आरोग्य केंद्र आशा सार्वजनिक ठिकाणी राज्यमंत्री दत्तामामा भरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा गारटकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.”असे ते म्हणाले.
एकूणच या कचरापेट्यामुळे नियोजितपणे कचरा संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्यास मदत होणार असल्याने या गटात समाधान व्यक्त केले जात आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here