प्रतिनिधी: गणेश खारतोडे
यवत: पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्विवाद बहुमत मिळवले असून लवकरच होणाऱ्या अध्यक्ष पदासाठी जिल्हा बँकेतील जेष्ठ आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी दौंड राष्ट्रवादी सह जिल्हयातील पक्षीय कार्यकर्ते करु लागले आहेत.रमेश थोरात हे दौंड मधून सलग आठव्यांदा बिनविरोध निवडून येऊन जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील जिल्हा बँक क्षेत्रात हॅटूरिक करणारे ठरले आहेत. थोरात हे सहकारातील जेष्ठ नेते मार्गदर्शक मानले जात आहेत. जिल्हा बँकेतील त्यांची कार्यपद्धती ही आदर्शवत, पारदर्शक आणि बँकेला प्रगतीकडे नेणारी आहे. जिल्हा बँकेच्या सर्व शाखा कर्मचारी, जिल्ह्यातील गावो-गावच्या विविध विकास सहकारी सेवा संस्थेची डिटेल माहिती असणारे आणि एकमेव बँकेला पूर्ण बँकेसाठी वेळ देणारा रमेश थोरात यांच्या हाडा मासात बँक आहे, कर्मचारी उशिरा येतील, परंतू थोरात वेळेवर आणि पूर्णवेळ बँकेत हजर असतात. ना कधी, खाडा, ना कधी रजा, कधीही बँकेत गेली की थोरात बसलेले हमखास दिसणारच, त्यामुळे या कार्यक्षम नेत्याला पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा संधी द्यावी अशी मागणी केली जात आहे.वेळ वाहून घेतलेले नेते रमेश थोरात आहेत. राज्यात सहकारी क्षेत्रात अग्रेसर असणारी बँक यापूढेही अशीच प्रगतीकडे नेण्यासाठी अध्यक्षपदी रमेश थोरात असणे काळाची गरज असल्याची प्रतिक्रिया चेअरमन, सहकारातील कार्यकर्ते आणि संचालक व्यक्त करीत आहेत.