दौंड : कोरोना (कोविड – १९ ) महामारीमुळे बंद असलेल्या शाळा, महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. परंतु सुमारे २ वर्षापासून शाळा बंद असल्याने शाळांची वीज बिले थकीत असल्याने वीज बिल वसुलीसाठी महावितरण विभागाद्वारे राज्यातील अनेक शाळांची वीज जोडणी खंडित केलेली आहे त्यामध्ये पुणे जिह्यातील सुमारे ८०० तर माझ्या दौंड मतदार संघातील ५२ शाळांची वीज जोडणी खंडित करण्यात आली आहे.
कोरोना काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झालेले असून, सद्यस्थितीत शाळा सुरु झाल्या, परंतु शासनाने शाळांची वीज जोडणी खंडित केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणुन वीज जोडणी पुर्ववत करण्याची आवश्यकता आहे. तसेच राज्यातील जिल्हा परिषद शाळा, शासकीय विद्यालये यांचेकडे वीज बील भरणेबाबत तरतुद नसल्याने, त्यासाठी धोरण ठरविणे आवश्यक असून, याबाबत सरकारने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. आशी मागणी आज राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब, उप मुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित दादा पवार साहेब, उर्जा मंत्री मा. ना. श्री. नितीन राऊत साहेब, ग्रामविकास मंत्री मा. ना. श्री. हसन मुश्रीफ साहेब यांचेकडे आज आमदार राहुल कुल यांनी पत्राद्वारे केली.