दौंड:(प्रतिनिधी: महेश सूर्यवंशी) देऊळगाव राजे,दौंड ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ स्वाती अमित गिरमकर यांनी गावामध्ये विविध विकासकामे मार्गी लावत गाव आदर्श ग्रामच्या दिशेने घेऊन जाण्यास प्राधान्य दिले. कोरोनाकाळात त्यांनी विशेष उपाययोजना राबवून कोरोनामध्ये अनोखा संघर्ष केला. वृक्षारोपणालादेखील विशेष महत्त्व दिले. तसेच गावातील स्मशानभूमी ,गाव अंतर्गत सिमेंट रोड,पाणी योजना. त्यांच्या या कार्याची दखल घेत “पुणे जिल्हा परिषद” पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सौ. स्वाती अमित गिरमकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, लिंगळी मलठन गटाचे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, ग्रामसेवक अमर शेख ,माझी सरपंच अमित गिरमकर, उपसरपंच नारायण गिरमकर, आप्पासो खेडकर, मदन खेडकर,दादा गिरमकर,दादा सोनवणे,यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.