जिल्हाधिकारी आणि उपायुक्त यांच्या निकालांना शेटफळ हवेलीच्या महिला सरपंचांनी दिला शह.. अखेर रूपाली पवार यांच्याकडे सरपंच पद कायम.

गेल्या तीन वर्षापासून इंदापूर तालुक्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत शेटफळ हवेली या गावच्या सरपंच पदाविषयी कोर्टकचेऱ्या चालू होत्या. गावच्या सरपंच सौ रुपाली संतोष पवार यांना सुमारे ५०० मताने थेट निवडणुकीमध्ये गावाने निवडून दिलेले होते.गावचे उपसरपंच यांनीच विद्यमान सरपंच गायरानात राहून शेतीही करतात यामुळे गायरानाचा फायदा घेणारे व्यक्ती सरपंच पदासाठी पात्र नसते असा दावा जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे केला होता. जिल्हाधिकारी पुणे यांनी सर्व वस्तुस्थिती पाहिल्यानंतर उपसरपंच यांच्या बाजूने निकाल देत सरपंच रूपाली पवार ह्या सरपंच पदासाठी अपात्र ठरविल्या होत्या.
सरपंच रूपाली पवार यांनी अपात्रतेच्या गोष्टीबद्दल दाद मागण्याकरिता उपायुक्त यांच्याकडे स्टे ची विनंती केली. परंतु उपायुक्तांनीही त्यांचा स्टे नाकारल्याने सरपंच पद गेल्यातच जमा होते. परंतु गायरान हे आपल्या सासर्‍यांच्या नावावर आहे,१ गुंठा सुद्धा जमीन आपल्या नावावर नाही म्हणून आपल्यावर अन्याय होतोय यासाठी सरपंच रूपाली पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात थेट हायकोर्ट गाठले.हायकोर्टानेही सर्व वस्तुस्थिती पाहिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालावर स्टे देत सरपंच पद कायम ठेवले आणि या ठिकाणी रूपाली पवार यांना सरपंच पदाचा दिलासा मिळाला. हा सर्व घटनाक्रम झाल्यानंतर आयुक्तांकडे स्टे नाकारल्याची केस चालूच होती परंतु गायरानाबद्दल सबळ पुरावा नसल्याने व १ ई या शासकीय दप्तरांमध्ये खाडाखोड आढळल्याने आयुक्तांनीही सरपंच रूपाली पवार यांच्या बाजूने निकाल दिला आणि अखेर त्यांच्या या लढ्याला यश मिळाले..
सदरचा घटनाक्रम अतिशय नाट्यमयीरीत्या सुरू होता आणि या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास तब्बल ३ वर्षे लागले होते या तीन वर्षात सुद्धा गावामध्ये रस्ते आणि इतर विकासाची कामेही झालेली दिसून आली.”कोणी कितीही विरोध केला तरी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजनाची कन्या म्हणून मी गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहील,गावाने जो विश्वास ठेवला आहे त्याला मी पात्र राहण्याजोगे काम करत राहील तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना यावर माझा विश्वास आहे म्हणून मला न्याय नक्की मिळेल असा अपेक्षा होती” असेही मत सरपंच रूपाली पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
एकूणच असं म्हणतात की एखाद्या तालुक्याचा आमदार होणं सोपं आहे परंतु गावगाडा चालवत असताना सरपंच पद टिकवणे हे मात्र अवघड असतं हेच शेटफळ हवेलीच्या या उदाहरणावरून सांगता येईल.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here