जिजाऊ जयंतीदिनी जिजाऊंच्या लेकींचा सन्मान करीत इंदापूरात जिजाऊ जयंती साजरी.

धावत्या युगात केवळ चुल आणि मुल या पुरतेच महिलांचे क्षेत्र सिमीत न राहता शिक्षणाच्या जोरावर पुरूषांच्या खांद्याला खांदा लावुन काम करणार्‍या कर्तुत्ववान महिलांनी देशात सर्वच स्तरावर आघाडी घेतली आहे.देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत स्त्रीयांनी झेप घेतल्याने महिलांच्या कर्तुत्वाचा ठसा सर्वत्र उमटत आहे.भविष्यात कर्तुत्ववान महिलां समाजाला प्रगतीपथावर आणण्याचे काम करणार असल्याचे मत प्रा.जयंत नायकुडे यांनी इंदापूर येथे जिजाऊ जयंतीनिमित्त बोलताना व्यक्त केले.मराठी पत्रकार परिषद संलग्न इंदापूर मराठी पत्रकार संघ व जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग इंदापूर यांचे संयुक्त विद्यमाने इंदापूर शहरातील दत्तनगर येथे राजमाता जिजाऊ यांची ४२४ वी जयंती साजरी करण्यात आली.त्याप्रसंगी प्रा.जयत नायकुडे बोलत होते.यावेळी माज उपनगराध्यक्ष कृष्णाजी ताटे सर, भाजप ओबीसी मोर्चा इंदापूर तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे, न.प.काँग्रेस गटनेता कैलास कदम,नगरसेवक अनिकेत वाघ,भाजप शहराध्यक्ष शकिल सय्यद,राष्ट्रवादी महिला आघाडी शहराध्यक्षा उमाताई इंगोले!डाॅ.ओंकार ताटे,प्रकाश आरडे, अशोक घोडके! दत्तात्रय मिसाळ इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी विविध सामाजिक,राजकीय, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्तत्ववान जिजाऊंच्या लेकीं पत्रकार धनश्री गवळी, उमाताई इंगोले, उज्वलाताई चौगुले,करिष्मा शहा,स्मिताताई पवार,महिला जयश्रीताई खबाले,अनिताताई खरात सविता मोहिते यांचेसह जय इंन्टिट्युटचे अध्यक्ष जयंत नायकुडे व त्यांच्या पत्नी लताताई नायकडे, ह.भ.प.आबासाहेब उगले यांचाही सन्मानचिन्ह देवुन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार सुधाकर बोराटे यांनी केले तर सूत्रसंचालन आकांक्षा दाभाडे यांनी केले.

 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here