गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव,जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशनच्या वतीने स्पर्धेचे आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी:जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशन आयोजित गौरी गणपती सजावट महाराष्ट्र स्पर्धेतील विजेत्यांना इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो या ठिकाणी जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशनच्या संस्थापक अध्यक्षा भाग्यश्री हर्षवर्धन पाटील तसेच जिल्हा परिषद सदस्या व जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशनच्या कार्याध्यक्षा अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
850 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. महिलांमध्ये असलेल्या कलागुणांना व त्यांच्यामधील कल्पकतेला वाव मिळावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या असोसिएशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील आणि जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी दिली.
प्रीती सोमनाथ पिसाळ देशमुख तक्रारवाडी, कांताबाई पांडुरंग हुंबे कचरवाडी, रूपाली संतोष दातखिळे सरडेवाडी, स्वाती दत्तात्रय दातखिळे सरडेवाडी, सोनाली बाळासाहेब राऊत निमगाव केतकी, प्रियंका सागर ठोंबरे लासुर्णे, छाया मधुकर कुंभार अंथुर्णे, मेघा लखोजी जगताप कालठण नंबर 2, सोनाली सचिन शेंडे इंदापूर या विजेत्या स्पर्धकांचा तसेच तेजस गायकवाड निमगाव केतकी यांचा विशेष सन्मान यावेळी अंकिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
पद्मभूषण वसंतदादा पाटील विद्यालय निरवांगी येथील विद्यार्थिनी कु. गौरी संजय फडतरे हीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत 95 % गुण मिळवल्याबद्दल जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशनच्या वतीने तिला पाच हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.
मोठ्या उत्सवात पार पडलेल्या या कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा मायाताई विंचू ,युथ कनेक्टच्या सहकारी भाग्यश्री धायगुडे, पूजा शिंदे यावेळी उपस्थित होत्या.