करमाळा( सोलापूर)- तालुक्यातील केतुर नंबर 2 येथे जागेच्या कारणावरून शेजारी मध्ये वाद झाला.यात एकाने दोघांच्या डोक्यात कोयत्याने वार केला असून यात दोघे जखमी झाले आहेत.यातील एक महिला व पुरुषाला सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले आहे.या मारहाण प्रकरणी एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.यात जखमी चा मुलगा सतीश शंकर मंजुळे (वय 32 )रा. केतुर नंबर 2 तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मंजुळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की आमच्या शेजारी धोत्रे हे कुटुंब राहत होते.आमच्या जागेचा कारणावरून पूर्वी वाद झाला होता. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तेव्हा पासून ते व त्यांच्या घरातील लोक आमच्या वर चिढुन होते. गुरुवारी ता.3 सायंकाळी सात वाजता च्या सुमारास घरासमोर असताना पोपटवाला धोत्रे यांनी तुम्ही येथे राहायचे नाही हि जागा आमच्या मालकिची आहे अशी धमकी दिली.तेव्हा ही जागा सरकारी असून आम्ही इथे खूप दिवसापासून आहोत. आम्ही जागा खाली करणार नाही असे मावशीने म्हणताच धोत्रे यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.त्याने काहीही न ऐकता आम्हाला शिवीगाळ करत आकाश पोपट धोत्रे ,राजू पटेल,यांनी कोयत्याने वडील शंकर यांच्या डोक्यात मारून जखमी केले त्यावेळी मी सोडवण्यासाठी गेलो तेव्हा आकाश ने हातावर मारून मला जखमी केले. दोघांच्या हातात काठ्या होत्या त्यांनी मावशी व वडील यांना काठीने मारहाण केली.तुम्ही इथे राहिलात तर तुम्हाला जिवंत ठेवत नाही अशी धमकी देऊन ते निघून गेले. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. तेथे डॉक्टरांनी वडील व मावशी यांना पुढील उपचारासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात रेफर केले आहे.