श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडाच्या मुलींनी सीमेवरील सैनिकांसाठी बनविल्या १५०० राख्या.. ! देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिना निमित्त श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात एक अगळा आणि वेगळा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सीमेवरती देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांनसाठी विद्यालयातील मुलीनी तब्बल १५०० राख्या स्वतःच्या हाताने बनविल्या . या वर्षी आपण देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना देशासाठी प्राणपणाने लढणारे आमचे बंधु जवान यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यालयातील मुलींनी १५०० राख्या बनविल्या व त्या सीमेरती पाठवल्या.यावेळी मुलींनी फुगडीचा फेर धरला व देशभक्ती गीत म्हणत राख्या बनविल्या.
Home Uncategorized सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी पाठवल्या 1500 राख्या: श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय...