पालघर (वैभव पाटील : प्रतिनिधी ) दि.13 एप्रिल रोजी मुस्लिम बांधवांच्या रमजान या पवित्र महिन्यात हिंदू- मुस्लिम समाजात एकता अखंडपणे टिकून रहावी व समाजातील प्रेम अधिक वृद्धीगत व्हावे या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील सर यांच्या संकल्पनेतून पोलीस जनता यांच्यामध्ये सुसंवाद घडावा यासाठी जनसंवाद अभियान उपक्रम राबवण्यात येत आहे. सफाळा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व मुस्लिम बांधव सर्वपक्षीय सर्व धर्मीय आणि सर्व क्षेत्रातील मान्यवरांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन आज 13 एप्रिल रोजी राधाचंद्र हॉल सफाळे येथे सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आली होती.
यावेळी पंकज शिरसाठ अप्पर पोलीस अधीक्षक पालघर यांनी समाजात एकतेची भावना अशीच वाढत गेली पाहिजे व सामाजिक एकोपा आणि बांधिलकी जोपासुन प्रेम वृद्धिगत करून खेळी मेलीने राहिले पाहिजे असे यावेळी बोलत होते. तर निता पडवी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी पालघर व अमोल गवळी सहाय्यक निरीक्षक सफाळे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी सफाळे परिसरातील सर्व पोलीस पाटील, पंकज शिरसाठ अप्पर पोलीस अधीक्षक पालघर , नीता पाडवी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी पालघर , अमोल गवळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सफाळे , भीमसेन गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक केळवा,मौलाना गुलाम सखर, मौलाना हाफिज शास तबरेज , सफाळे ग्रामपंचायतचे उपसरपंच राजेश म्हात्रे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सिकंदर शेख, इरफान शेख , मनसेचे मंगेश घरत व परिसरातील सर्व जाती-धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.